महिलांवरील अत्याच्याराच्या कितीतरी घटना समोर येत आहेत. महिलांच्या सुरक्षेचा विचार करता त्यांच्या नेहमी सोबत असलेल्या किंवा त्या वापरत असलेल्या वस्तूंनाच हायटेक बनवण्यात आलं आहे.
2/ 8
आता ही चप्पल पाहा. तशी पाहिली तर ही डिझाइनर चप्पल. पण ही साधीसुधी चप्पल नाही तर खास धुलाईसाठीच बनवण्यात आली आहे असं म्हणायला हरकत नाही.
3/ 8
यूपीच्या मेरठमधील एका इनोव्हेटरने ही चप्पल तयार केली आहे. ज्यावर बटण आहे. हे बटण दाबत ज्या व्यक्तीला ही चप्पल मारली जाईल त्या व्यक्तीला करंट बसेल.
4/ 8
महिला कुठे बाहेर गेल्या की त्यांच्याकडे एक पर्स असते. अशीच एक पर्स तयार करण्यात आली आहे. ज्यातून बंदुकीच्या गोळीचा आवाज येतो.
5/ 8
या पर्सला तुम्हाला एक नळी दिसेल. या नळीतून बंदुकीची गोळी सुटावी तसा आवाज येतो. यामुळे समोरची व्यक्ती घाबरून पळालीच समजा.
6/ 8
दागिने म्हणजे कित्येक महिलांच्या जिव्हाळ्याची वस्तू. अशाच दागिन्यांमध्ये जीपीएस बसवण्यात आलं आहे. जेणेकरून दागिने चोरीला गेले तर त्यांची माहिती मिळेल.
7/ 8
याआधीही महिलांसाठी स्मार्ट झुमके तयार करण्यात आले होते. असे इअरिंग ज्यातून मिरची बुलेट बाहेर पडते.
8/ 8
या झुमक्यातून मिरची पूडची बुलेट निघते. तसंच पोलिसांपर्यंत अलर्टही पोहोचवण्यास हे झुमके मदत करतात.