विजयादशमीच्या सणावर रामाने रावणावर विजय मिळवल्याचा आनंद देशभरात साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी रामाने रावणाचा वध करून युद्ध जिंकले. रावण हा एक पराक्रमी राक्षस राजा होता, जो एक विद्वान देखील होता आणि त्याने तपश्चर्या करून अनेक शक्ती प्राप्त केल्या होत्या. मात्र, त्याने आपल्या बुद्धिमत्तेचा आणि शक्तींचा वापर वाईट कृत्यांमध्ये केला. रावणाचे वडील महान ऋषी होते. त्यांनी दोन लग्ने केली. पण लहानपणापासूनच ते रावणावर रागावायचे. या कारणास्तव, नंतर त्याच्या वडिलांनी त्याला शाप दिला, ज्याने सर्वनाश झाला. सोन्याची लंका ही रावणाने नाही तर त्याच्या प्रसिद्ध भावाने बांधली होती, ज्याच्या ऐश्वर्याचा देवांनाही हेवा वाटत होता.
सुवर्ण लंका रावणाच्या प्रसिद्ध सावत्र भावाने बांधली होती. रावणाने लंकेवर हल्ला केला तेव्हा हा भाऊ जीव वाचवून पळून गेला. जो पुन्हा इथे परत येऊ शकले नाही. पौराणिक ग्रंथांबरोबरच रामचरित मानस, वाल्मिकी रामायण आणि इतर ग्रंथांमध्येही याचा उल्लेख आढळतो. काही काळापूर्वी प्रसिद्ध झालेल्या अनंत नीलकंठन यांच्या ‘असुर’ या पुस्तकात रावणाने ऐश्वर्याची नगरी म्हणवल्या जाणाऱ्या सुवर्ण लंकेवर आक्रमण करून कशी जिंकली याचे तपशीलवार वर्णन आहे. त्यानंतर त्याने येथे दीर्घकाळ राज्य केलं.
रावणाच्या या भावाचे नाव कुबेर होते. होय, तोच कुबेर ज्याला धनाची देवता म्हटले जाते. कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ होता. तो श्रीमंत होता. कुबेरांनी लंकेवर राज्य करून केवळ विस्तारच केला नाही तर तिचे सोन्याच्या नगरीत रूपांतर केले. त्यामुळे लंकेच्या वैभवाची सर्वत्र चर्चा होऊ लागली.
रावणाचे वडील सुप्रसिद्ध ऋषी होते. त्यांचे नाव होते विश्रवा. त्यांना दोन बायका होत्या. पहिल्या पत्नीच्या पोटी कुबेराचा जन्म झाला तर रावण, कुंभकर्ण, विभीषण आणि शूर्पणखा यांचा जन्म दुसरी पत्नी कैकशीच्या पोटी झाला. विश्रवा ऋषींची दुसरी पत्नी कैकशी राक्षस कुळातील होती.
अनंत नीलकंथन यांच्या पुस्तक "असुर"नुसार, कुबेर एकीकडे ऐश्वर्य आणि संपत्तीचा स्वामी होता आणि श्रीलंकेचा राजा होता. त्याचवेळी, रावण आणि त्याचे इतर भाऊ आणि बहिणी खूप गरिबीत जगत होते. त्यांना हलाखीचे जीवन जगावे लागले. कुबेराची वागणूकही रावण आणि त्याच्या भावा-बहिणींशी चांगली नव्हती. तसेच त्यांनी कधीही त्यांना मदत केली नाही. कुबेराच्या अपमानास्पद वागणुकीने तरुण रावण दुखावला जायचा.
यानंतर रावणाने तपश्चर्या केली. अनेक प्रकारच्या शक्ती प्राप्त केल्या. त्याने स्वतःला खूप मजबूत बनवले. पुढे परिस्थिती अशी बनली की रावणाने हल्ला करून कुबेराकडून सोन्याची नगरी हिसकावून घेतली. कुबेरला तेथून पळावे लागले. हिंदू पौराणिक ग्रंथांमध्ये कुबेर यांना केवळ धन आणि संपत्तीचा देव मानला जात नाही, तर तो यक्षांचा राजा देखील आहे.
पुराण सांगतात की कुबेराच्या आधीही माली, सुमाली आणि माल्यवान नावाच्या तीन राक्षसांनी लंकापुरीला त्रिकुटा सुबेल म्हणजेच सुमेरू पर्वतावर वसवलं होतं. मालीचा वध केल्यानंतर देव आणि यक्षांनी कुबेराला लंकापती बनवले. रावणाची आई कैकशी ही या तीन राक्षसांपैकी एक सुमालीची मुलगी होती. नाना सुमालीच्या चिथावणीवरून रावणाने आपला सावत्र भाऊ कुबेर याच्याशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला.
रावणाने प्रथम तपश्चर्या केली आणि नंतर जंगलात राहून त्याने मजबूत सैन्य तयार केले. जेव्हा रावणाने कुबेराच्या वैभवशाली नगरावर सैन्यासह हल्ला केला, तेव्हा हा हल्ला इतका तीव्र होता की कुबेर आणि त्याचे सैन्य टिकू शकले नाही, त्याला तेथून आपल्या कुटुंबासह पळून जावे लागले.
कुबेर तिथून पळून गेला. तेथून तो अलका पर्वतावर जाऊन राहू लागला. यानंतर रावणाने त्याची सर्व संपत्ती आणि लंका ताब्यात घेतली. मात्र, कुबेरांनी स्वत: वडील विश्रवा यांच्या सांगण्यावरून रावणाला लंका दिली होती, असेही म्हटले जाते. या वेळी रावणाने कुबेरचे पुष्पक विमानही हस्तगत केले, ज्याचा त्याने पुरेपूर उपयोग केला. रावण सीतेचे अपहरण करण्यासाठी याच विमानात जंगलात गेला होता. नंतर श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला तेव्हा ते या विमानाने अयोध्येला परतले.
अनंत नीलकंथन यांचे पुस्तक असुर आणि रामानंद सागर यांच्या टीव्ही सीरियल रामायणनुसार, रावणाचे वडील विश्रवा त्याच्या कृत्यांवर रागावायचे. एक दिवस ही लंका आपल्या हातून निघून जाईल असा शापही त्यांनी दिला होता. त्याला केवळ पराभवच नाही तर मृत्यूलाही सामोरे जावे लागणार होते. नंतर झालेही तसेच.