1- गरम पाण्यात पांढरं व्हिनेगर टाकून त्यात मीठ टाका. त्यात चांदीच्या वस्तू टाका आणि अर्धा तास तसंच राहू द्या. त्यामुळं चांदीवर साचलेला काळपट थर सहज निघून जातो. काही वेळानं खराब झालेला टूथब्रश वापरून चांदी स्वच्छ करा. ती चमकू लागेल.
2- चांदीच्या वस्तू टूथपेस्ट आणि टूथ पावडरनंही उजळवता येतात. पण यासाठी फक्त पांढरी कोलगेट टूथपेस्ट आणि टूथ पावडर चांगलं काम करते. ती चांदीच्या वस्तूवर लावून ब्रशने घासून घ्या आणि गरम पाण्यात घाला. काही वेळातच चांदी चमकू लागेल.
3- गरम पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा टाकून त्यात चांदीच्या वस्तू टाका. अर्ध्या तासानंतर घासून घ्या. चांदी स्वच्छ होईल. जर तुम्ही घासण्यासाठी फॉइल पेपर वापरत असाल तर तुम्हाला अधिक चांगली चमक मिळेल.
4- कोरोनाच्या काळात हँड सॅनिटायझर प्रत्येक घरात आहे. हे चांदीच्या पॉलिशिंगसाठी देखील वापरलं जाऊ शकतं. यासाठी एका भांड्यात थोडं सॅनिटायझर घ्या. त्यात चांदी घाला. अर्ध्या तासानंतर घासून पुन्हा सॅनिटायझरमध्ये बुडवा. काही वेळानं कोमट पाण्यानं चोळून धुवा. चांदी चमकेल.
5- जर चांदी फारशी काळी पडली नसेल तर लिंबाच्या रसात थोडं मीठ टाकूनही ती साफ करता येते. याशिवाय गरम पाण्यात डिटर्जंट टाकून त्यात चांदी काही वेळ ठेवून द्या. त्यानंतर ती चोळा. काही वेळात चांदीची वस्तू स्वच्छ होईल.