डोळे मिचकावत राहा : मेडिकल न्यूज टुडेच्या माहितीनुसार, तुम्ही बराच वेळ डोळे मिचकावत नसाल तरीही तुमचे डोळे कोरडे होऊ शकतात. त्यामुळे डोळ्यांमध्ये नैसर्गिक वंगण राहण्यासाठी डोळे मिचकावत रहा.
हेअर ड्रायर टाळा: हेअर ड्रायर वापरल्याने व्यक्तीचे डोळेही कोरडे होऊ शकतात, त्यामुळे हिवाळ्यात अशा गोष्टींचा वापर शक्यतो करू नका.
धूम्रपान टाळा: सिगारेटच्या धुरामुळे डोळ्यांना त्रास होतो, त्यामुळे तुम्ही सिगारेट ओढणे टाळावे आणि आजूबाजूला कोणी मद्यपान करत असेल तर तिथे जाऊ नका.
भरपूर पाणी प्या: हिवाळ्यात आपण कमी पाणी पितो परंतु हिवाळ्यात देखील हायड्रेशन खूप महत्त्वाचे आहे, म्हणून भरपूर पाणी प्या. या सगळ्या गोष्टींव्यतिरिक्त, स्क्रीन टाइम कमी करणे आणि डोळ्यांचे संरक्षण करणे यासारख्या इतर काही गोष्टींकडे लक्ष द्या.