दही-मुलतानी माती फेस पॅक : त्वचेवरील टॅनिंग आणि सनबर्नमुळे होणारे प्रॉब्लेम्स घालवण्यासाठी दही आणि मुलतानी माती फेसपॅक लावणे ही एक अतिशय प्रभावी कृती आहे. बनवण्यासाठी एका वाडग्यात 1 चमचा दही, 2 चमचे मुलतानी माती पावडर आणि 1 टीस्पून एलोवेरा जेल मिक्स करून पेस्ट बनवा. आता हा फेस पॅक चेहऱ्यावर चांगला लावा आणि 15 मिनिटे वाळल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यानंतर कापसाच्या मदतीने गुलाबपाणी हलकेच चेहऱ्यावर लावा.
दही-ओट्स फेस पॅक : दही आणि ओट्सचा फेस पॅक चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करतो. बनवण्यासाठी 2 चमचे दह्यात 1 चमचे ओट्स मिसळा आणि काही वेळ भिजवू द्या, त्यानंतर त्याची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर आणि मानेवर मसाज करा. 15 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.
दही-टोमॅटो फेस पॅक: दही आणि टोमॅटोचा फेस पॅक चेहऱ्याची पीएच पातळी राखून छिद्रे स्वच्छ ठेवतो. ज्यामुळे मुरुमे आणि पिंपल्सचा त्रास कमी होतो. तो बनवण्यासाठी 1 चमचे दह्यात अर्ध्या टोमॅटोचा रस आणि लिंबाचा रस मिसळा आणि चेहरा आणि मानेला लावा. 10-15 मिनिटे सुकल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा.
दही-अंडी फेस पॅक : चेहरा उजळण्यासाठी अंडी आणि दही यांचे मिश्रण ही सर्वोत्तम कृती आहे. याशिवाय त्वचा मुलायम आणि चमकदार बनते. हा फेस पॅक बनवण्यासाठी 2 चमचे दह्यात अंड्याचा पांढरा भाग आणि 1 केळी मिसळा. आता त्यात 1 चमचा बेसन घाला. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि 15 मिनिटे सुकल्यानंतर चेहरा धुवा.
दही-मेथी बियांचा फेस पॅक: दही आणि मेथीच्या बियांचा फेसपॅक लावल्याने त्वचा अधिक तरुण दिसते. यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा देखील नाहीशा होतात. यासाठी 1 चमचे दह्यात 1 चमचा मेथी पावडर, अर्धा चमचा बदामाचे तेल आणि अर्धा चमचा गुलाबजल मिसळून पेस्ट तयार करा. ती चेहऱ्यावर चांगले लावा आणि कोरडे झाल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे तुमचा चेहरा नैसर्गिकरित्या चमकू लागेल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)