मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » Sea Salt Benefits: फक्त स्कीनसाठीच नाही, केसांसाठीही समुद्री मिठाचा होतो फायदा; अशा पद्धतीनं वापरा

Sea Salt Benefits: फक्त स्कीनसाठीच नाही, केसांसाठीही समुद्री मिठाचा होतो फायदा; अशा पद्धतीनं वापरा

Sea Salt Benefits for Hair : केसांची निगा राखण्यासाठी लोक वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतात, महागड्या हेअर प्रॉडक्टपासून ते अनेक घरगुती उपाय अवलंबले जातात. तरीही उन्हाळ्यात केस निरोगी ठेवणे बहुतेक लोकांसाठी कठीण काम बनते. अशा परिस्थितीत समुद्री मीठ केसांसाठी सर्वोत्तम उपाय ठरू शकते. त्वचेच्या निगा राखण्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या समुद्री मीठाचा वापर उन्हाळ्यात केसांसाठीही फायदेशीर ठरतो. समुद्री मीठ त्वचेवर तसेच केसांच्या अनेक समस्यांवर खूप प्रभावी आहे. केसांची काळजी घेण्यासाठी समुद्री मीठाचा वापर आणि त्याचे काही अनोखे फायदे जाणून घेऊया.