महिला असो किंवा पुरूष शॉपिंग करायला प्रत्येकालचं आवडतं. त्यामुळे जिथे आपल्याला स्वस्त आणि कमी किंमतीत हवी ती वस्तू मिळेल असा बाजार शोधला जातो. आज आम्ही तुम्हाला पुण्यातील अशाच बाजाराबद्दल सांगणार आहोत.
पुण्यात असा एक बाजार आहे जिथे तुम्ही जुन्या शालेय ग्रामोफोनपासून ते काळात गेलेल्या पितळ्याच्या भांड्यांपर्यंतच्या वस्तूंची खेरदी करू शकतात.
हा बाजार जुन्या बाजारपेठांपैकी एक असून या बाजाराला चोर बाजार म्हणून ओळखलं जातं. हा बाजार 250 वर्ष जुना आहे. दर बुधवार आणि रविवार कसबा पेठ जवळ हा बाजार भरवला जातो.
येथे शिफ्ट स्टॉल लावलेले असतात. ज्यामध्ये हस्तकला आणि पेंटिंग पर्यंतच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू विकत मिळतात.
पण याव्यतिरिक्त देखील तुम्हाला आश्चर्यकारक काही वेगवेगळ्या वस्तू पाहायला मिळतील. ज्यामध्ये छोट्या आकाराचे परफ्युम्स आणि डिझायनर लॉक सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतील.
1 रुपयांच्या वस्तूंपासून ते पुढे वाजवी दरात पितळाची भांडी, जुनी नाणे, जुने रेडिओ, अवजार, कपडे, शूज आणि जुन्या वेगवेगळ्या वस्तू याठिकाणी मिळतात.