advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / तुमचा Blood group कोणता? रक्तगटावरून ओळखा तुम्हाला कोरोनाचा किती धोका

तुमचा Blood group कोणता? रक्तगटावरून ओळखा तुम्हाला कोरोनाचा किती धोका

आतापर्यंत वयोगट, लिंग आणि आजार यावरून कोरोनाव्हायसचा सर्वात धोका कुणाला हे ठरतं आहे, मात्र आता रक्तगटावरही (Blood group)  कोरोनाचा धोका अवलंबून आहे. हे संशोधनात दिसून आलं आहे.

01
तुमचा ब्लडग्रुप म्हणजेच रक्तगट (Blood group)  कोणता आहे? हे आता यासाठी महत्त्वाचं आहे, कारण त्यावरून तुम्हाला कोरोनाव्हायरसचा (coronavirus) धोका आहे की नाही हे समजेल.

02
रक्तगटानुसार त्या व्यक्तीवर कोरोनाव्हायरसचा परिणाम कसा होतो, याबाबत युनिव्हर्सिटी ऑफ साऊथर्न डेन्मार्कच्या (University of Southern Denmark.) संशोधकांनी हा अभ्यास केला. ब्लड अॅडव्हान्सेस जर्नलमध्ये ( journal Blood Advances) हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

03
संशोधकांनी डॅनिश हेल्थ रजिस्ट्रीमध्ये नोंद झालेल्या 473,000 कोरोना रुग्णांचा रक्तगट तपासला. ज्यामध्ये ज्यांचं रक्तगट O आहे असे कोरोना रुग्ण कमी होते. मात्र 'A', 'B', आणि 'AB' रक्तगट असलेले कोरोना रुग्ण जास्त होते

04
'ओ' रक्तगटापेक्षा 'ए', 'बी', आणि 'एबी' रक्तगट असलेल्यांना कोरोनाचं इन्फेक्शन कमी प्रमाणात होतं. असं या अभ्यासातून दिसून आलं आहे.

05
O रक्तगट असलेल्यांना कोरोनाव्हारसचा धोका कमी आहे आणि कोरोनाव्हायरसची लागण झाली तरी त्याचा गंभीर परिणाम होत नाही, असं संशोधकांनी सांगितलं.

06
तसंच 'ए', आणि 'एबी' रक्तगट असलेल्यांना  'बी' आणि ओ रक्तगटापेक्षा गंभीर कोरोना होतो. या रुग्णांच्या फुफ्फुस आणि किडनीवर परिणाम होतो. फुफ्पुसाला हानी पोहोचते, श्वास घ्यायला त्रास होतो त्यांना  व्हेंटिलेशनवर ठेवावं लागतं. तर किडनी फेल झाल्याने त्यांना डायलेसिसचीही गरज पडते.

07
याआधीदेखील जर्नल क्लिनिकल इन्फेक्शिअस डिसीजमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अभ्यासात ए रक्तगटाला कोरोनाव्हायरसचा धोका सर्वात जास्त तर ओ रक्तगटाला कमी धोका आहे, असं दिसून आलं होतं.

08
पण तरी तुमचा रक्तगट ओ असला आणि तुम्हाला कोरोनाचा धोका कमी असला तरीदेखील बिनधास्त राहण्याची गरज नाही. कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी ज्या ज्या उपाययोजना आणि नियम आहेत, त्यांचं पालन कराच.

  • FIRST PUBLISHED :
  • तुमचा ब्लडग्रुप म्हणजेच रक्तगट (Blood group)  कोणता आहे? हे आता यासाठी महत्त्वाचं आहे, कारण त्यावरून तुम्हाला कोरोनाव्हायरसचा (coronavirus) धोका आहे की नाही हे समजेल.

    MORE
    GALLERIES