अरे देवा! कोरोनाचा आणखी एक स्ट्रेन; या देशात नव्या रूपाबाबत शास्त्रज्ञानं केलं Alert
यूके, द. आफ्रिकानंतर आता आणखी एका देशात कोरोनाचं नवं रूप दिसून आलं आहे.
|
1/ 5
यूके आणि दक्षिण आफ्रिकेत कोरोनाव्हायरसचा नवा स्ट्रेन आढळून आला. ब्रिटनमधील कोरोना भारतातही पोहोचला. महाराष्ट्रातही नव्या कोरोनाचे रुग्ण आढळलेत. त्यात आता आणखी एका देशातून तिसऱ्या एका नव्या कोरोनाचं संकट आहे.
2/ 5
नायजेरियातील (Nigeria) लागोस युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसीन अँड टिचिंग हॉस्पिटलमधील सेंटर फॉर ह्युमन अँड ज्युनोटिक व्हायरोलॉजीचे संचालक ओमिलोबू यांनी कोरोनाच्या आणखी एका नव्या रूपाबाबत माहिती दिली आहे.
3/ 5
ओमिलोबू यांनी देशातील कोरोना संक्रमणाला रोखण्यासाठी काही नमुन्यांचं आनुवंशिक विश्लेषण केलं. ओमिलाबू यांनी सांगितलं, ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत (South Africa) जो व्हायरसचा रूप दिसून आला आहे, त्यापेक्षा वेगळा व्हायरस नायजेरियात आहे.
4/ 5
व्हायरस नवं रूप घेणं हे असामान्य नाही. आपल्याला आता अधिक सावध राहावं लागेल कारण कोरोनाचे आणखी नवे रूप समोर येणार आहेत, असा इशारा ओमिलोबू यांनी दिला आहे.
5/ 5
नायजेरियात कोरोना प्रकरणं वाढत आहेत. हा कोरोना इतक्या वेगानं पसरतो आहे, यामागे कोरोनाचं नवं रूप तर कारणीभूत नाही ना, याबाबत आता अधिक अभ्यासाची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.