भात : बरेचजण कुकरमध्ये भात झटपट होतो म्हणून भात कुकरमध्ये बनवतात. परंतु असे करणे चांगले नाही कारण जेव्हा भात कुकरमध्ये शिजवला जातो तेव्हा भातातील स्टार्च एक्रिलामाइड नावाचे रसायन बाहेर सोडले जाते जे आरोग्यासाठी चांगले नसते.
पास्ता : प्रेशर कुकरमध्ये जर तुम्ही पास्ता बनवत असाल तर त्यातील स्टार्चची मात्रा अधिक वाढते. हे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पास्ता नेहमी कढईत बनवा.
भाज्या : भाज्यांमध्ये खनिजे, व्हिटामिन्स सारखी अनेक पोषक तत्वे असतात. कुकरमध्ये भाज्या शिजवल्याने त्यातील पोषकतत्वे निघून जातात, तेव्हा भाज्या नेहमी कढईत शिजवा.
मासे : काहीजण कुकरमध्ये मासे शिजवतात. परंतु असे केल्याने मासे प्रमाणाच्या बाहेर शिजतात त्यामुळे तुम्ही इच्छित असलेला पदार्थ बिघडू शकतो.
बटाटा : बरेच लोक बटाटे प्रेशर कुकरमध्ये शिजवतात. पण असे करणे चुकीचे ठरू शकते. भाताप्रमाणे बटाट्यामध्ये स्टार्च असते. यामुळे बटाट्याला प्रेशर कुकरमध्ये शिजवणे आरोग्यासाठी चांगले नाही.