advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / इथं दर महिन्याच्या 14 तारखेला व्हॅलेंटाईन डे; प्रत्येक महिन्यात वेगळी मजा

इथं दर महिन्याच्या 14 तारखेला व्हॅलेंटाईन डे; प्रत्येक महिन्यात वेगळी मजा

दक्षिण कोरियामध्ये व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस केवळ 14 फेब्रुवारीलाच नाही, तर इथे प्रत्येक महिन्याची 14 तारीख तरुण जोडप्यांच्या प्रेम आणि रोमान्सच्या नावावर असते.

01
14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे - कोरियामध्ये या दिवशी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. कोरियन स्त्रिया प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांच्या प्रियकरांना चॉकलेट देतात. सहसा ज्या पुरुषांना या भेटवस्तू मिळतात, ते पुढच्या महिन्यात म्हणजे 14 मार्चला, प्रेमाचा दिवस म्हणजेच व्हाईट डे या दिवशी रिटर्न गिफ्ट देतात. (शटर स्टॉक)

02
14 मार्च व्हाइट डे - 35 वर्षांपूर्वी जपानमध्ये व्हाइट डे साजरा केला होता. खरंतर, कोरिया आणि जपानमध्ये व्हॅलेंटाईन डे हा महिलांच्या प्रेमाच्या प्रदर्शनाचा दिवस मानला जातो, तर 14 मार्च हा दिवस पुरुषांसाठी त्यांच्या प्रेमाच्या भावना व्यक्त करण्याचा दिवस आहे. आजकाल ते आपल्या मैत्रिणींना मिठाई, चॉकलेट्स, अंतर्वस्त्र इत्यादी रिटर्न गिफ्ट म्हणून देतात. भेटवस्तूचा रंग फक्त पांढराच असावा. मात्र, आता इतर रंगांची चॉकलेट्स आणि अंतर्वस्त्रेही दिली जात आहेत. (शटर स्टॉक)

03
14 एप्रिल काळा दिवस - ज्या अविवाहित मुला-मुलींना व्हॅलेंटाईन डे किंवा व्हाईट डेला कोणतीही भेटवस्तू मिळाली नाही, ते सर्वजण 14 एप्रिलला काळा दिवस साजरा करतात. त्या दिवशी ते एकत्र बसून जिज्यामगिग्यॉन म्हणजेच काळे नूडल्स खातात. यावेळी सर्व सिगल्स लोक एकत्र येऊन दुःख व्यक्त करतात. हे सर्व 20 वर्षांवरील सिंगल कोरियन असतात. (शटर स्टॉक)

04
14 जानेवारी डायरी दिवस - ही कोरियाची अनधिकृत प्रेम सुट्टी आहे. या दिवशी प्रेमीयुगुल एकमेकांवर प्रेम व्यक्त करतात. यावेळी ते एकमेकांसोबत डायरीची देवाणघेवाण करतात. यामध्ये त्यांचा वाढदिवस आणि महत्त्वाच्या तारखा लिहिलेल्या असतात. (शटर स्टॉक)

05
14 मे रोज डे किंवा यलो डे - कोरियामध्ये मे महिन्यात गुलाब फुलून येतात. या दिवशी प्रेमी जोडपे पिवळे कपडे घालतात आणि प्रेमाने ऐकमेकांना गुलाब देतात. आपल्या प्रियकर किंवा मैत्रिणीला देत असलेले गुलाब पिवळ्या रंगाचे असावे, याची ते विशेष काळजी घेतात. (shutterstock)

06
14 जून किस डे - या तारखेला लव्ह बर्ड्स पुन्हा एकदा बाहेर पडून प्रेमासाठी सज्ज होतात. उन्हाळ्याची सुट्टी साजरी करण्यासाठी हे जोडपे एकत्र कुठेतरी फिरायला जातात. पूल पार्टी आणि एकमेकांना किस करून हा दिवस साजरा केला जातो. कोरियामध्ये या दिवशी लिपस्टिक आणि पुदिन्याच्या गोळ्या मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. (शटर स्टॉक)

07
14 जुलै सिल्वर डे - प्रेमात नातं घट्ट असेल, दोघेही ऐकमेकांबद्दल गंभीर असतील. तर मग 14 जुलैला चांदीची अंगठी घालायची की नाही हे ते ठरवतात. दोघांचाही विचार पक्का झाल्यानंतर ते एकत्र दागिन्यांच्या दुकानात जाऊन चांदीच्या अंगठ्या विकत घेतात. यावर एकमेकांची नावेही कोरलेली असतात. या दिवशी, हे तरुण जोडपे पहिल्यांदाच एकमेकांच्या पालकांना भेटायला घेऊन जातात. मग कुटुंबाच्या मंजुरीची प्रतीक्षा करतात. (शटर स्टॉक)

08
14 ऑगस्ट ग्रीन डे - उन्हाळ्यातील कंटाळवाणे दिवस सरल्यानंतर प्रेमाचा दिवस पुन्हा ऑगस्टमध्ये ग्रीन डे म्हणून येतो. या दिवशी प्रेमीयुगुल कुठेतरी बाहेर जातात आणि एकत्र मद्यपान करतात. ते सहसा सोजू, कोरिया अल्कोहोलची बाटली घेऊन त्यांच्या शहरातील पिकनिक स्पॉटवर जातात. तिथे कोरियन लोक या हिरव्या रंगाच्या बाटलीत येणाऱ्या दारूचा आनंद घेतात.(दक्षिण कोरिया)

09
14 सप्टेंबर फोटो दिवस किंवा संगीत दिवस - प्रेम व्यक्त करण्याचा आणखी एक दिवस. जेव्हा प्रियकर-प्रेयसी एकत्र फोटो काढतात आणि गाणी गातात. काही स्टुडिओ कोरियामध्ये या दिवशी व्यावसायिक मेकअप आणि केशभूषा पॅकेज देखील देतात. (दक्षिण कोरिया)

10
14 ऑक्टोबर वाईन डे- घ्या आणखी एक प्रेमाचा दिवस. याला वाईन डे म्हणतात. नातं अधिक दृढ करण्यासाठी वाईनच्या बाटलीने ते आनंद व्यक्त करतात. कोरियामध्ये वाईनची कोणतीही ऐतिहासिक प्रथा नसली तरी हा दिवस अलिकडच्या दशकात लोकप्रिय झाला आहे. या दिवशी, जोडपं एकत्र गुलाबी वाइनचा आनंद घेतात. (शटरस्टॉक)

11
14 नोव्हेंबर मूव्ही डे - रोमँटिक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जाऊन प्रेमाची गोष्ट पुढे नेण्याचा हा दिवस आहे. काही तरुण प्रेमी खाजगी स्क्रीनिंग रूममध्ये त्याचा आनंद घेतात. ते त्यांच्या आवडीची डीव्हीडी आणतात आणि मोठ्या स्क्रीनवर एकत्र चित्रपटाचा आनंद घेतात. (शटरस्टॉक)

12
14 डिसेंबर हग डे किंवा सॉक्स डे - डिसेंबर हा कोरियामध्ये कडाक्याच्या थंडीचा काळ असतो. या काळात हग डे वर, पार्टनर्स एकमेकांना मनापासून मिठी मारतात. मिठी देण्याबरोबरच या दिवशी प्रेमी युगुलांनी एकमेकांना मोजेही भेट देण्याची प्रथा आहे. (shutterstock)

  • FIRST PUBLISHED :
  • 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे - कोरियामध्ये या दिवशी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. कोरियन स्त्रिया प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांच्या प्रियकरांना चॉकलेट देतात. सहसा ज्या पुरुषांना या भेटवस्तू मिळतात, ते पुढच्या महिन्यात म्हणजे 14 मार्चला, प्रेमाचा दिवस म्हणजेच व्हाईट डे या दिवशी रिटर्न गिफ्ट देतात. (शटर स्टॉक)

    MORE
    GALLERIES