पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाळा म्हटलं की पावसाळी चप्पल आणि शूज खरेदी करायची हे अगदी प्रत्येकाचे ठरलेले असते. कमी किंमतीमध्ये पण, ट्रेंडिंग चप्पल आणि शूज घेण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. त्यामुळे पावसाळी चप्पल आणि शूज खरेदी करण्याचं मुंबईतील एक खास मार्केट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कुर्ला परिसरात चप्पल आणि शूज खरेदी करण्यासाठी शू मार्केट आहे. या मार्केटच्या नावानंच हा परिसर ओळखला जातो.
या मार्केटमध्ये कमी किंमतीमध्ये चप्पल, क्रोक्स, फ्लीप फ्लॉप,सॅन्डल, शूज, फॉर्मल, पोलीस शूज असे विविध पावसाळी प्रकार उपलब्ध आहे.
या बाजारात 30 - 40 दुकाने आहेत, येथे तूम्हाला पाहिजे तसे शूज मिळतात. पावसाळी शूज सोबत या ठिकाणी आपल्याला ब्रॅंडेड शूज देखील कमी दरात मिळू शकतात.
तीस वर्षांपूर्वी हे मार्केट सुरू झालं. या बाजारात सुरुवातीला जुनी बूट मिळायची मात्र कालांतराने परिस्थिती बदलली असून आता ट्रेंड नुसार वेस्टर्न संस्कृती नुसार इथे नवीन शूज मिळायला लागले.
पावसाळा निमित्त विविध प्रकारच्या चप्पल आणि पावसाळी शूज बाजारात आले आहेत, अशी माहिती येथील विक्रेते ईश्वर आहिरे यांनी दिली.
या मार्केटमध्ये ब्रँड, नॉन ब्रँड, मेड इन इंडिया, मेड इन युएसए असे सर्व प्रकार मिळतात. हा संपूर्ण भाग आता एक हब बनलाय. मुंबईत आलेले विदेशी नागरिकही इथं खरेदीसाठी येतात, अशी माहिती आहिरे यांनी दिली.