गणेशोत्सव म्हटलं की बहुतेक लोक कोकणाकडे धाव घेतात. तुम्हीसुद्धा कोकणात जाण्याच्या तयारी असाल तर आधी हे कोरोनासंबंधी नियम वाचा.
2/ 9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुम्हाला गणेशोत्सवासाठी जात असाल तर त्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
3/ 9
जिल्ह्याबाहेरून प्रवेश करण्यासाठी कोरोना लशीचे दोन डोस घेतलेले असावेत.
4/ 9
लशीचे दोन डोस घेतले नसतील तर 72 तासांपूर्वीचा RTPCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणं आवश्यक आहे.
5/ 9
18 वर्षांखालील मुलांचे लसीकरण होत नसल्याने त्यांच्या प्रवेशास RTPCR चाचणी अहवाल आवश्यक नाही.
6/ 9
ज्या प्रवाशांकडे कोरोना लशीच्या दोन मात्रा पूर्ण झालेले प्रमाणपत्र किंवा RTPCR चाचणीचा अहवाल नसल्यास, अशा प्रवाशांची मोफत Rapid Antigen Test (RAT) तपासणी केली जाईल.
7/ 9
चाचणीमध्ये बाधित आढळणाऱ्या किंवा लक्षणं दिसणाऱ्या व्यक्तींना तात्पुरत्या संस्थात्मक विलगीकरणात ठेवलं जाईल.
8/ 9
कोरोना चाचणी किंवा कोरोना बाधित व्यक्तीच्या विलगीकरणास विरोध करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांमार्फत कारवाई केली जाईल.
9/ 9
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम/ सूचना पाळून सिंधुदुर्गकरांनी गणेशोत्सव आनंदाने साजरा करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केलं आहे.