advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Eye Flu : चांद्रयान-3 मुळे पसरतीये डोळे येण्याची साथ? आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं सत्य

Eye Flu : चांद्रयान-3 मुळे पसरतीये डोळे येण्याची साथ? आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं सत्य

पावसाळा सुरू झाला की, विविध प्रकारच्या रोगराई पसरतात. यातील काही आजार संसर्गजन्य असतात. सध्या देशाची राजधानी दिल्लीसह देशाच्या इतर अनेक भागांमध्ये कंजंक्टिवायटिस म्हणजेच डोळ्याच्या फ्लूची समस्या वेगानं वाढत आहे. डोळे दुखणं, लालसर होणं, जळजळ होणं, डोळ्यांत सलणं अशा तक्रारी घेऊन मोठ्या संख्येने लोक हॉस्पिटलमध्ये जात आहेत. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, या आजाराबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे उपचारांतही अडचणी येऊ शकतात

  • -MIN READ | Trending Desk Mumbai,Maharashtra
01
अमर उजालाशी झालेल्या संभाषणात डॉक्टरांनी सांगितलं की, कंजंक्टिवायटिस या समस्येला 'पिंक आईज' म्हणूनदेखील ओळखलं जातं. या पूर्वीही दिल्लीत अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरानंतर परिस्थिती अशीच बिघडली होती. त्यामुळे सर्व नागरिकांनी गैरसमज टाळून संरक्षणात्मक उपाय करणं आवश्यक आहे.

02
चांद्रयान-3 प्रक्षेपणाचा आणि डोळ्यांना संसर्ग होण्याचा काहीही संबंध नाही: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये, डोळ्यांच्या फ्लूच्या वाढत्या प्रकरणांमागे चांद्रयान-3 लाँचिंग कारणीभूत असू शकतं अशी जोरदार चर्चा आहे. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात, डोळ्यांचा फ्लू हा व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे होणारा संसर्ग आहे. संक्रमित व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्यामुळे तो होतो. चांद्रयान-3 लाँचिंगशी त्याचा काहीही संबंध नाही. लोकांनी अशा अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये.

03
कंजंक्टिवायटिस संसर्गजन्य असेलच असं नाही: कंजंक्टिवायटिस संसर्गजन्य आहे आणि एखाद्या संक्रमित व्यक्तीशी जवळून संपर्क आल्यास त्याचा प्रसार होण्याचा धोका वाढू शकतो यात शंका नाही. पण, डोळ्यांच्या फ्लूचे अनेक प्रकार संसर्गजन्य नसतात.

04
व्हायरल आणि बॅक्टेरियल कंजंक्टिवायटिस (स्टेफिलोकोकल किंवा स्ट्रेप्टोकोकल बॅक्टेरियामुळे होतो) खूप संसर्गजन्य असतात. तर, अॅलर्जिक कंजंक्टिवायटिसची संसर्गजन्यता तितकी जास्त नसते.

05
डोळे लाल झाले म्हणजे कंजंक्टिवायटिस होईलच असं नाही: कंजंक्टिवायटिसच्या स्थितीत डोळे लाल होणं ही खूप सामान्य बाब आहे. पण, प्रत्येक वेळी डोळे लाल झाले म्हणजे डोळ्यांचा फ्लू झाला, असा याचा अर्थ होत नाही. डोळ्यांच्या इतर अनेक समस्या आहेत ज्यामुळे तुमचे डोळे लाल होऊ शकतात.

06
कंजंक्टिवायटिस कोणालाही होऊ शकतो: लोकांमध्ये असा गैरसमज आहे की, कंजंक्टिवायटिस ही समस्या फक्त लहान मुलांमध्येच जास्त असते. पण, ही समस्या कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकते

07
 सामान्यपणे, संसर्गजन्य कंजंक्टिवायटिस हाताचा डोळ्यांशी झालेल्या संपर्कामुळे होतो. त्यामुळे सर्व वयोगटातील लोकांनी प्रतिबंधात्मक उपाय करणं गरजेचं आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • अमर उजालाशी झालेल्या संभाषणात डॉक्टरांनी सांगितलं की, कंजंक्टिवायटिस या समस्येला 'पिंक आईज' म्हणूनदेखील ओळखलं जातं. या पूर्वीही दिल्लीत अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरानंतर परिस्थिती अशीच बिघडली होती. त्यामुळे सर्व नागरिकांनी गैरसमज टाळून संरक्षणात्मक उपाय करणं आवश्यक आहे.

    MORE
    GALLERIES