कोरोनाव्हायरसवर प्रभावी असं औषध नाही. मात्र कोरोनामुळे उद्भवणाऱ्या लक्षणांनुसार सध्या विविध आजारांवर उपलब्ध असलेल्या औषधांनी कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या ज्या औषधांनी कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत, त्या औषधांपेक्षाही प्रभावी असं औषध भारतीय शास्त्रज्ञांना सापडलं आहे.