सध्या वेगवेगळ्या कंपन्यांमधलं कामाचं वेळापत्रक एवढं वेगळं आहे की अनेक ठिकाणी नाइट शिफ्टही करावी लागते आणि ही अत्यंत साधी गोष्ट झाली आहे. पण ही गोष्ट फार लोकांना माहीत नाही की, नाइट शिफ्टमुळे अनेक आजारांना आमंत्रण दिलं जातं.
संशोधनानुसार, नाइट शिफ्ट करणाऱ्यांच्या डीएनएमध्ये दुरुस्ती करणारा जनुक त्याच्या योग्यतेनुसार काम करत नाही आणि अपुऱ्या झोपेमुळे ही परिस्थिती अजून बिकट होते.
संशोधनात हे समोर आलं आहे की, ज्या व्यक्ती नाइट शिफ्ट करतात त्यांच्या आरोग्याचं इतरांपेक्षा जास्त नुकसान होतं. सर्वसामान्य शिफ्ट करणाऱ्यांपेक्षा आरोग्य बिघडण्याचा धोका नाइट शिफ्ट करणाऱ्यांमध्ये 30 टक्क्यांनी जास्त असतो. यामुळे त्यांना कर्करोग, हृदय रोग, श्वसनासंबंधी अनेक आजार होऊ शकतात.
अनेस्थेिया अॅकेडमिक जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, डीएनएमध्ये बदल होणं याचा अर्थ असा की, त्याची मुलभूत संरचना बदलणं.
याचा अर्थ असा की, डीएनए जेव्हा दुसऱ्यांदा तयार होतो तेव्हा त्यात दुरुस्ती होत नाही आणि तयार झालेला डीएन हा कमकूवत तयार होतो. यामुळे अनेक गंभीर आजार तुम्हाला होऊ शकतो.
शोधात 28 ते 33 वर्षांच्या तंदुरुस्त डॉक्टरांच्या रक्ताच्या चाचण्या केल्या. या डॉक्टरांनी सलग तीन दिवस शरीराला योग्य एवढी झोप घेतली होती. यानंतरच त्यांच्या रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या. यानंतर ज्यांनी रात्र जागून काम केलं आणि ज्यांची झओप अपूरी झाली अशांच्याही रक्ताच्या चाचण्या केल्या.
संशोधकांनुसार, ज्यांना अपुरी झोप मिळाली किंवा रात्रीची झोप घेता आली नाही त्यांचे डीएनए इतरांच्या मानाने कमकूवत होते. त्यामुळे नाइट शिफ्टमध्ये अनेक काळ काम केल्याने अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतं