आजकाल, बाजारात अशी अनेक औषधं उपलब्ध आहेत ज्याद्वारे स्त्रिया आपल्या मासिक पाळीची तारीख पुढे ढकलू शकतात. ही औषधं मासिक पाळीची तारीख काही दिवसांपासून ते आठवड्यांपर्यंत पुढे ढकलण्यास मदत करतात. पण, या औषधांचे दुष्परिणामदेखील होतात. ज्यामुळे स्त्रियांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. तुम्हाला काही कारणास्तव पिरियड्स पुढे ढकलायचे असतील तर त्यासाठी काही घरगुती नैसर्गिक पद्धतींचा वापर करता येऊ शकतो. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
1) मोहरी - एक चमचा मोहरी रात्रभर पाण्यात किंवा दुधात भिजवून ठेवा. पिरियड्स सुरू होण्याच्या एक आठवडा आधीपासून त्याचं सेवन करा. यामुळे तुमचे पिरियड्स उशिरा येण्यास मदत होऊ शकते. मोहरीचे फायदे - मोहरीमध्ये अनेक पोषक घटक असतात. त्यांच्या मदतीनं नैसर्गिकपणे तुमचे पिरियड्स पुढे ढकलले जाऊ शकतात.
2) अॅपल सीडर व्हिनेगर - जर तुम्हाला तुमच्या पिरियड्सची तारीख पुढे ढकलणं गरजेचं वाटत असेल तर हे व्हिनेगर घेऊ शकता. कोमट पाण्यात एक चमचा अॅपल सीडर व्हिनेगर मिसळा आणि तुमच्या पाळीच्या तारखेच्या 10 ते 12 दिवस आधीपासून सेवन करा. अॅपल सीडर व्हिनेगरचे फायदे - याचं सेवन केल्यानं पोट फुगणं आणि पोटदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो. यामध्ये असलेलं अॅसिड मासिक पाळी लांबवण्यास मदत करते.
3) लिंबाचा रस - अॅपल सीडर व्हिनेगरप्रमाणेच कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने पिरियड्स लेट होऊ शकतात. लिंबाच्या रसाचे फायदे - लिंबाचा रस पाण्यात मिसळून प्यायल्यानं पिरियड्स दरम्यान येणाऱ्या सर्व समस्यांपासून सुटका मिळते. लिंबाच्या रसामुळे वेदना कमी होतात आणि ब्लिडिंगदेखील कमी होऊ शकतं.
4) मुलतानी माती - पिरियड्सची तारीख पुढे नेण्यासाठी मुलतानी मातीदेखील खूप फायदेशीर ठरू शकते. यासाठी 25 ते 30 ग्रॅम मुलतानी माती गरम पाण्यात मिसळा आणि मासिक पाळीच्या तारखेच्या एक आठवडा आधी तिचं सेवन करा. मुलतानी मातीचे फायदे - यामुळे कोणत्याही दुष्परिणामांशिवाय तुमच्या पिरियड्सची तारीख पुढे जाऊ शकते. ही खूप जुनी आयुर्वेदिक पद्धत आहे जी तुम्हाला खूप मदत करू शकते.
5) काकडी - काकडीतील कूलिंग इफेक्टमुळे पिरियड्स लांबण्यास मदत होते. असं म्हटलं जातं की, थंड पदार्थांमुळे मासिक पाळी लांबण्यास मदत होते. काकडी शरीराला गारवा देते आणि म्हणूनच मासिक पाळी पुढे ढकलण्यात ती फायदेशीर ठरू शकते. मासिक पाळीच्या तारखेच्या सुमारे एक आठवडा आधीपासून काकडी खावी.
6) जिलेटिन - पिरियड्सची तारीख पुढे जाण्यासाठी जिलेटिन खूप फायदेशीर ठरू शकते. यासाठी गरम पाण्यात जिलेटिनचं पॅकेट मिसळा. जर तुम्हाला आपत्कालीन परिस्थिती असेल तर हा उपाय तुम्हाला फार लवकर आराम देऊ शकतो. यामुळे तुमचे पिरियड्स सुमारे चार तास उशिरा येऊ शकतात.
जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं पिरियड्स पुढे ढकलण्यासाठी औषधं घेतली तर त्यामुळे तुमचं फारसं नुकसान होत नाही. परंतु, अशा अनेक महिला आहेत ज्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधे घेतात. त्याऐवजी घरगुती उपायांचा वापर जास्त योग्य ठरू शकतो.