सध्या कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये अनेकांना घरी बसून कंटाळा आलेला असेल. अनेकदा हातात काही काम नसेल किंवा अजिबातच घरातून बाहेर पडता येत नसेल मनावर एकप्रकारची मरगळ येते. त्यासाठी या काही सोप्या टीप्स
बऱ्याच दिवसांपासून घरात राहून आपल्या मनावरही ताण येतो. अशावेळी तुमच्या आवडीची गाणी ऐका. त्यासाठी सध्या प्लेस्टोअरवर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय तुम्ही युट्यूबचीही मदत घेऊ शकता.
नेहमीच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला वाचन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. पण आता तुमच्याकडे हा वेळ आहे. या वेळात जमेल तेवढं वाचन करा मनाला तजेला मिळेल.
पुस्तकं वाचण्यासाठी तुम्हाला लायब्ररीमध्ये जाण्याचीही गरज नाही. ऑनलाइन वाचनाचे बरेच पर्याय उपलब्ध तर आहेतच पण ऑडिओ बुक हा नवा पर्याय सुद्धा तुम्हाला वापरता येऊ शकतो.
घरात लहान मुलं असतील तर त्यांच्यासोबत खेळा. ताणाव घालवण्यासाठी यासारखा दुसरा चांगला पर्याय असूच शकत नाही. प्रसन्न वाटेल आणि बालपणीच्या आठवणीही जाग्या होतील.
अनेकदा बीझी शेड्युलमध्ये कुटुंबाला वेळ देणं शक्य नसतं. या काळात तुम्ही हे नक्कीच करु शकता. एकत्र बसून गप्पा मारा. नाती सुधारतील आणि मोकळं वाटेल.
आई-पत्नीला जेवणात मदत करा कारण तुम्ही घरी असलात तरी तिला सुट्टी नाहीच. जर जेवण येत नसेल तर त्यांच्याकडून शिकून घ्या. येत असेल तर एखाद वेळी स्वतः बनवून इतरांना खाऊ घाला.
कुकिंगची आवड असेल तर जे करायला वेळ मिळत नाही अशी तुमची तक्रार असते असे पदार्थ करुन पाहा. नव्या रेसिपी ट्राय करा.
नवं काहीतरी शिकण्याची हिच वेळ आहे. अनेक गृहिणी अद्यापही डिजिटल युगापासून लांब आहेत. मला जमत नाही असं म्हणण्यापेक्षा सध्या मुलंही घरात आहेत मुलांकडून शिकून घ्या.