दररोज अंघोळ करावी हे आपल्याला लहानपणापासूनच शिकवलं जातं. अगदी शाळेतही स्वच्छतेच्या धड्यात आपण हेच शिकलो. दिवसातून किमान एकदा तरी अंघोळ करावी, असं म्हणतात. काही लोक दिवसातून दोनदाही अंघोळ करतात.
पण अंघोळ नेमकी किती वेळा करावी, याबाबत तज्ज्ञांनी जे उत्तर दिलं आहे ते मात्र शॉकिंग आहे. एका टीव्ही शोमध्ये स्किन एक्सपर्ट्सनी अंघोळ किती वेळा करावी हे सांगितलं आहे.
अल रोकर, शीनेल जोन्स आणि डायलन ड्रेअर अशी या तज्ज्ञांची नावं. टीव्ही टॉक शोमध्ये अँकरने त्यांना आठवड्यातून किती वेळा अंघोळ करावी, असा सवाल केला. यावर तिन्ही तज्ज्ञांनी उत्तर दिली आहेत.
तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, जास्त अंघोळ केल्याने त्वचा कोरडी होऊ शकते. तुम्हाला एक्जिमासारख्या त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.
तुम्ही कोणत्या हवामानात राहता? तुमची जीवनशैली काय आहे? तुमचं वय किती आहे? तुम्ही काम करता त्या ठिकाणचं वातावरण कसं आहे? यावर किती वेळा अंघोळ करावी हे अवलंबून आहे, असं तज्ज्ञ म्हणाले.
रॉकर आणि जोन्स यांनी दररोज अंघोळ करण्याचा सल्ला दिला आहे. तर ड्रेयर यांनी आठवड्यातून पाच वेळा अंघोळ करयाला हवी असं म्हटलं. पण सर्व त्वचा तज्ज्ञांनी खरंतर आठवड्यातून दोन-तीन वेळाच अंंघोळ करावी असं सांगितलं आहे.
मिररच्या वृत्तानुसार जेव्हा टुडे शोने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला तेव्हा लोकांना आश्चर्य वाटले. यावर बऱ्याच कमेंट आल्या आहेत. तुमचं याबाबतच मत आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.