- सोयाबीनच्या (Soybean) शेंगांपासून बनवलेले स्नॅक्स अशावेळी फायदाचे असतात. एक कप हिरव्या सोयाबीन शेंगा उकडवून घ्यायच्या त्यात चवीनुसार मीठ, मिरची पावडर, लाल शिमला मिरचीचे तुकडे आणि चवीला जिरे पावडर टाकून एक छान नाश्ता बनवता येऊ शकतो. ह्या शेंगा शरीराला पुरेसे प्रोटीन देणाऱ्या तर आहेतच सोबत यात कॅलरी कमी असतात.