बद्धकोष्ठता : गर्भधारणेदरम्यान महिलांना अनेकदा बद्धकोष्ठतेची समस्या जाणवते. अशा परिस्थितीत या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी पीच फळाचे सेवन केल्यास आराम मिळू शकतो. एका संशोधनात असे आढळून आले आहे की पीचमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने आतडे स्वच्छ करण्यासाठी तसेच बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी याचा फायदा होतो.
डायबिटीज : गरोदरपणात डायबिटीजची समस्या देखील पीचच्या मदतीने दूर केली जाऊ शकते. पीचमध्ये आढळणारे फायबर गर्भधारणेदरम्यान डायबिटीजच्या समस्येवर फायदेशीर ठरतात.
पीच फळामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम सोबतच प्रथिने, फायबर, फोलेट, कोलीन, बीटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-सी सारखे पोषक घटक आढळतात. जे गर्भवती महिलेसह गर्भाच्या विकासासाठी देखील फायदेशीर ठरू शकते.
पीचमध्ये असलेले व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास उपयुक्त ठरू शकते. मजबूत प्रतिकारशक्ती स्त्रीच्या शरीराला अनेक प्रकारच्या संक्रमण आणि रोगांपासून वाचवू शकते.
गरोदरपणात, दिवसभरात अर्धा कप पीच चांगले धुऊन खाऊ शकतो, परंतु खाण्यापूर्वी, आरोग्य आणि वजनानुसार पीचचे योग्य प्रमाण जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.