मुलींना मुलांमधले कोणते गुण आवडतात खरंच महत्वाचा विषय आहे. कारण, मुलांना नेहमी वाटतं की आपल्यात असे गुण असावेत की आपण मुलींना आवडायला लागू.
चांगल्या जोडीदार बनण्यासाठी केवळ चांगलं दिसणंच आवश्यक नसतं तर, चांगलं असणंही महत्वाचं असतं. एखाद्या मुलींच्या मनात घर करायचं असेल तर, स्त्रियांना पुरूषांमधील 7 गुण जास्त आवडतात.
आत्मविश्वास असणारी मुलं मुलींना जास्त आवडतात. ज्या मुलांचं वागणं कॉन्फिडन्ट असतं त्या मुलांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते. मुली त्याकडे आकर्षित होता.
मुलींना मस्करी करणारी गमतीदार स्वभावाची मुलं आवडतात. फार गंभीर स्वभावाची, सतत विचार करणारी मुलं मुलींना आवडत नाहीत. जोडीदाराने आपल्याला टेश्ननमध्ये असताना हसवावं असं त्यांना वाटतं. बुद्धीमान मुलंही महिलांना आवडतात .
दाढीमिशी असेली मुलं मुलींना आवडात का? हा खरंच एक प्रश्न आहे.पण, याचं उत्तर सोपं आहे. ज्यांना दाढीमिशी शोभून दिसते त्यांने नक्कीच ठेवावी.
स्वच्छ राहणीमान असणारी मुलं मुलींना आवडतात. ब्रँडेट कपडे घालण्यापेक्षा स्वच्छतेकडे लक्ष द्यावं. शरीराला घामाचा दुर्गंध येत असेल तर, मुली अशा मुलांना टाळतात.
आपल्या जोडीदाराच्या सहवासात सुरक्षित वाटावं असं मुलींना वाटत. एखाद्या वाईट प्रसंगात मुलांना भांडण करण्यापेक्षा त्यांचा बचाव करावं असं त्यांना वाटतं
जोडीदाराने आपल् बोलम्याला महत्व द्यावं, आपलं बोलणं पूर्ण ऐकावं, बोलत असताना त्याचं लक्ष आपल्याकडेच असावं. असं सगळ्याचं मुलींना वाटतं.