हळद त्वचेसाठी आरोग्यदायी - स्टाइलक्रेझमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, हळद हा सर्वाधिक वापरला जाणारा मसाला आहे. यामध्ये असलेल्या क्युरक्यूमिन या कंपाऊंडमध्ये प्रतिजैविक, अँटीऑक्सिडंट, दाहक-विरोधी आणि अँटीनोप्लास्टिक गुणधर्म आहेत. सोरायसिस, त्वचेचा कर्करोग, हायपरपिग्मेंटेशन, त्वचा संक्रमण आणि वृद्धत्वाच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी हळदीचे सेवन करा किंवा फेस पॅक म्हणून वापरा.
टोमॅटोमुळे त्वचा निरोगी राहते - टोमॅटोमध्ये सर्वात जास्त लाइकोपीन असते. हा एक प्रकारचा कॅरोटीनॉइड आहे, जो अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतो. टोमॅटोला लाइकोपीनपासून लाल रंग मिळतो. लाइकोपीन हानिकारक ऑक्सिजन रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करते. टोमॅटोची पेस्ट त्वचेवर लावल्याने अतिनील किरणांच्या दुष्परिणामांपासून आणि फोटोडॅमेजपासून संरक्षण मिळू शकते.
पपई त्वचेसाठी योग्य - पपई केवळ पोटाचे आरोग्य राखत नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. पपईमध्ये व्हिटॅमिन ए, बी आणि सी, डायटरी फायबर याशिवाय पॅपेन नावाचे एन्झाइम असतात. त्वचेच्या संक्रमणास प्रतिबंध करते. पपई खाल्ल्याने आतड्याची हालचाल, पचन व्यवस्थित होते. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकल्याने मुरुमे, पुरळ, पिगमेंटेशन इत्यादी समस्या आपोआप कमी होतात.
एवोकॅडोमुळे त्वचा निरोगी राहील - एवोकॅडोमध्ये जीवनसत्त्वे ए, ई, सी, के, बी6, नियासिन, रिबोफ्लेविन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स इ. हे सर्व निरोगी चरबी घटक वृद्धत्वाची लक्षणे कमी करतात. सूर्यप्रकाशामुळे होणारे नुकसान देखील कमी होतं. त्वचा मऊ राहते. तुम्ही सॅलड, स्मूदी, शेक बनवू शकता आणि ते अॅव्होकॅडोसोबत घेऊ शकता. तसेच त्वचेला निरोगी बनवण्यासाठी एवोकॅडोचा फेस मास्क लावा. यामुळे स्वच्छ, हायड्रेटेड आणि चमकदार त्वचा मिळेल.
बेरी खा - निरोगी त्वचेसाठी, तुम्ही स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, ब्लॅकबेरी, क्रॅनबेरी, गोजी बेरी, आवळा, रास्पबेरी इत्यादी खायला पाहिजे. कारण ही सर्व फळे व्हिटॅमिन सी, टॅनिन, आहारातील फायबर, फिनोलिक अॅसिड आणि फ्लेव्होनॉइड्सचा समृद्ध स्रोत आहेत. त्यांच्यामध्ये असलेले उच्च अँटिऑक्सिडेंट सामग्री त्वचेचे आरोग्य सुधारते, त्वचा वृद्ध दिसत नाही. त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यात मदत होते.
ब्रोकोली त्वचा तरुण ठेवते - ही एक क्रूसीफेरस भाजी आहे. जीवनसत्त्वे सी, ई आणि के, सेलेनियम, जस्त, पॉलिफेनॉल, लोह इत्यादींनी समृद्ध आहे. ब्रोकोलीमधील अँटिऑक्सिडेंट, अँटीमाइक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म त्वचेच्या आरोग्यास फायदेशीर आहेत. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)