कच्चा आंबा - कच्च्या आंब्याच्या मदतीने तुम्ही त्वचेचे उष्णतेपासून संरक्षण करू शकता आणि घामोळे कमी करू शकता. त्याच्या वापरासाठी, प्रथम तुम्ही गॅसवर कच्चा आंबा भाजून घ्या. थोडा थंड झाल्यावर त्याचा लगदा काढून फ्रीजमध्ये ठेवा. आता थंड झाल्यावर त्याचा लगदा अंगावर लावा.
काकडी - एका ग्लास पाण्यात लिंबाचा रस घाला आणि या पाण्यात काकडीचे पातळ काप टाका. आता हे तुकडे घामोळे आलेल्या भागांवर हळू हळू घासून घ्या.
खोबरेल तेल - खोबरेल तेलात थोडा कापूर मिसळा आणि या तेलाने संपूर्ण शरीराची मालिश करा. याच्या वापराने उष्णता-घामोळ्यांपासून आराम मिळतो.
कडुलिंबाची पानं - एक लिटर पाण्यात कडुनिंबाची पाने उकळून हे पाणी आंघोळीच्या पाण्यात मिसळून रोज आंघोळ केल्यास घामोळे निघून जातील.
तुळस - तुळशीचे थोडे लाकूड बारीक करून पावडर बनवा आणि ही पेस्ट घामोळे आलेल्या जागेवर लावा. तुम्हाला आराम मिळेल.
बेकिंग सोडा दोन चमचे बेकिंग सोडा घ्या आणि एक वाटी पाण्यात मिसळा आणि शरीराच्या प्रभावित भागावर लावा. काही वेळाने स्वच्छ पाण्याने धुवा.
कोरफड जेल एलोवेरा जेल घ्या आणि घामोळे आलेल्या भागावर लावा. रात्री झोपताना लावल्यास सकाळी घामोळे कमी होतील. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)