आज पाच दिवसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे. तुम्ही तुमच्या Whatsapp स्टेटस हे मॅसेज ठेवून आपल्या भावना व्यक्त करू शकता.
बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमच्या मनाला, ढोलच्या तालात गुलाल रंगात नेिरोप देऊ बाप्पाला, वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला…
गणेश विसर्जनाच्या दिवशी मंगलमूर्ती तुमच्या आयुष्यातील सारी दु:ख, वेदना घेऊन जावो! हीच आमची कामना बाप्पा मोरया !
डोळ्यात आले अश्रू बाप्पा आम्हाला नका विसरु.. आनंदमय करुन चालले तुम्ही, पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..
आभाळ भरले होते तू येताना, आता डोळे भरून आलेत तू जाताना, काही चुकलं असेल तर माफ कर, पुढल्या वर्षी ये लवकर…