लहानांपासून मोठ्यांपर्यंत लोक पाणीपुरी आवडीने खातात. मात्र पाणीपुरी खाल्ल्याने अनेक आजार दूर होत असल्याचं तुम्हाला माहिती आहे का?
अपचनाचा त्रास आहे? जर तुम्हाला वारंवार अपचनाचा त्रास असेल तर पाणीपुरीचं पुदीन्याचं आंबट पाणी तुमचा त्रास दूर करू शकेल.
पाणीपुरीत चिंचेव्यतिरिक्त कोथिंबीर, काळं मीठ, धन्याची पूड, मिरची, लिंबांचा रस असतो. त्यामुळे या पाण्यामुळे पचन होण्यास मदत होते.
वजन वाढत असल्याने तुम्ही पाणीपुरी खाणं बंद केलं आहे का? पाणीपुरीमध्ये लिंबू असल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी मदत होते.