सुरक्षित शारीरिक संबंधांसाठी कंडोम हे उत्तम साधन मानले जाते. ज्यामुळे लैंगिक आजार आणि अनावश्यक गर्भधारणा टाळता येते. असे असूनही अनेक लोक कंडोमचा वापर करत नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी आता सरकारनेच पुढाकार घेतला आहे.
2/ 6
फ्रान्स सरकार 25 वर्षांखालील तरुणांना मोफत कंडोम देणार आहे. त्याचा उद्देश अनावश्यक गर्भधारणा कमी करणे हा आहे. ही गर्भनिरोधकांच्या दिशेने एक छोटीशी क्रांती असल्याचे सांगत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी याची घोषणा केली.
3/ 6
आरोग्याशी संबंधित एका कार्यक्रमात बोलताना अध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले की, त्यांचे सरकार 18-25 वर्षे वयोगटातील तरुणांसाठी मेडीकलमध्ये मोफत कंडोम उपलब्ध करून देणार आहे.
4/ 6
या वर्षी मॅक्रॉन सरकारने 25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांना मोफत कंडोम देण्याची योजना सुरू केली होती. आता सरकारने सर्व तरुणांना देखील मोफत कंडोम देण्याचे पाऊल उचलले आहे.
5/ 6
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोग्य अधिकार्यांचा अंदाज आहे की 2020 आणि 2021 या वर्षांमध्ये, फ्रान्समध्ये लैंगिक रोगांचे (STD) प्रमाण सुमारे 30% वाढले आहे.
6/ 6
फ्रान्समध्ये, एड्स आणि इतर लैंगिक संक्रमित संसर्गाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेद्वारे कंडोमचा पुरवठा आधीपासूनच केला जात आहे.