तेलकट त्वचेसाठी घरगुती फेसवॉश - उन्हाळ्यात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि तेलकटपणा घालवण्यासाठी आपण घरगुती फेसवॉश वापरू शकतो. यामुळे त्वचेच्या तेलकटपणासह इतर अनेक समस्या कमी होतात.
मुलतानी माती आणि अॅस्पिरिन टॅब्लेट - मुलतानी माती आणि अॅस्पिरिन टॅब्लेट चेहऱ्यावरील मुरुम आणि पुरळ दूर करण्यात मदत करतात. एका भांड्यात 2 चमचे मुलतानी माती आणि 2 अॅस्पिरिनच्या गोळ्या एकत्र करा. पाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. सुमारे 10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवा. दररोज अंघोळ करण्यापूर्वी हे करा.
तांदळाचं पीठ - तांदळाच्या पिठानंही चेहरा धुता येतो. याच्यामुळं चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी निघून जाण्यासोबतच त्वचेचा रंग सुधारण्यास देखील मदत होईल. तांदळाच्या पिठात कॉर्न स्टार्च घालून पाण्यात मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून कोरडी होऊ द्या. पेस्ट सुकल्यावर हातानं चोळून चेहरा स्वच्छ करा. यामुळं त्वचेच्या समस्या दूर होतील. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)