Hair care Tips: शॅम्पू करताना करू नका या चुका; केसांची गळती वाढेल
केस गळायला लागले असतील तर, केसांची काळजी घ्यायलाच हवी. त्यासाठी चांगला आहार घ्यावा. पण, त्याचबरोबर केसांना शॅम्पू लावताना काही चुका तर होत नाहीत ना हेही पहायला हवं.
केसांचे प्रॉब्लेम सुरु झाले की आपण, केसांसाठी चांगला आहार घ्यायला सुरुवात करतो. चांगला आहार घेतल्यानंतरही केसांचं गळणं थांबत नसेल तर, आपण योग्य शॅम्पू लावतोय का? केसांमधून शॅम्पू व्यवस्थित स्वच्छ होत आहे का? हे पहायल हवं.
2/ 8
शॅम्पूचा योग्य वापर- बऱ्याच जणांना शॅम्पू लावण्याची योग्य पद्धत माहिती नसते. काहीजण शॅम्पू थेट केसांना लावतात. ही पद्धत चुकीची आहे. कोमट पाण्यात शॅम्पू मिसळून ते पाणी केसांना लावावं आणि केस स्वच्छ पाण्याने धुवावेत.
3/ 8
कंडिशनरचा वापर - केस धुतल्यावर कंडिशनर वापरायलाच हवं. केसांच्या मुळांना मात्र कंडिश्नर लाऊ नये. केसांना कंडिशनर लावल्यावर 2 मिनिटांनंतर पाण्याने केस चांगले धुवावेत
4/ 8
दररोज शॅम्पू नको-काही जण केसांना रोज शॅम्पू लावतात.त्यामुळे केसांचं नॅचरल ऑईल निघून जातं आणि केस ड्राय होतात. हेयर एक्सपर्ट्सच्या सल्ल्यानुसार केसांना दररोज शॅम्पू लावण्याची सवय असणाऱ्यानी रात्री झोपण्याआधी केसांना तेल लावावं.
5/ 8
चुकीचा शॅम्पू - केसांना चुकीचा शॅम्पू लावल्याने केस कमजोर व्हायला लागतात. त्यामुळेही केस गळायला लागतात. त्यामुळे आपल्या केसांच्या गरजेनुसार शॅम्पूची निवड करावी.
6/ 8
सल्फेट फ्री शॅम्पूचा वापर-सल्फेट फ्री शॅम्पू माइल्ड असतात. त्यामुळे केसांचं नुकसान होत नाही. हे शॅम्पू केमिकल फ्री तर असतातच शिवाय केसांना मुलायमही ठेवता.
7/ 8
हर्बल शॅम्पू- कोणत्याही हर्बल आणि आयुर्वेदिक शॅम्पूमध्ये हानीकारक केमिकल क्वचितच वापरले जातात. यामुळे केसांच्या मुळांना कमीतकमी नुकसान होतं आणि केस कमी गळतात.
8/ 8
ड्रायरचा वापर नको-शॅम्पूनंतर केस वाळवण्यासाठी लगेच ड्रायरचा वापर करु नका. केस मोकळे सोडून वाळवणं नेहमी चांगलं. केस लवकर वाळावेत यासाठी हीट मोडवर ड्रायर ठेऊन वाळवल्याने केसांचं नुकसान होतं.