चिकन टिक्का मसाला हा पदार्थ नॉनव्हेज प्रेमींचा सर्वात आवडता आहे. परंतु हा पदार्थ ब्रिटिश पाककृतीचा एक भाग आहे.
गुलाब जामून हा पदार्थ सर्वांचा आवडता आहे. परंतु बहुतेक सण समारंभांमध्ये बनवला जाणारा हा पदार्थ मूळ भारतीय नसून तो भूमध्य सागरीय आणि पर्शिया देशातील शोध आहे.
राजमा भात हा पदार्थ घराघरात बनवला जातो. परंतु हा पदार्थ मुळचा भारतीय नसून मेक्सिको, ग्वाटेमाला या देशातून भारतात आला.