advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Superbanana! हे केळं खाल्ल्यानंतर आजार होणार नाहीत, लाखो जीव वाचणार; शास्त्रज्ञांचा दावा

Superbanana! हे केळं खाल्ल्यानंतर आजार होणार नाहीत, लाखो जीव वाचणार; शास्त्रज्ञांचा दावा

सामान्य केळ्यांपेक्षा वेगळं असं खास असं केळं शास्त्रज्ञांनी तयार केलं आहे.

01
केळं आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. यात कार्बोहायड्रेट, जीवनसत्त्वे ए, सी आणि बी-6, लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, सोडियम, पोटॅशियम यांसारखे पोषक घटक शरीराला मजबूत करतात. त्यामुळे डॉक्टरही केळी खाण्याचा सल्ला देतात.

02
पण आता असं केळं तयार करण्यात आळं आहे. ते साधंसुधं नाही तर खास आहे. हा एक सुपरबनाना आहे. जो खाल्ल्यानंतर कित्येक आजार होणार नाहीत, आजार असले तरी ते बरे होती, रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होईल, असा दावा केला जातो आहे.

03
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आफ्रिकन देश युगांडाच्या कृषी शास्त्रज्ञांनी ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ जेम्स डेल आणि बिल, मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या सहकार्याने हे सुपरबाना तयार केलं आहे. हे अनुवांशिकरित्या सुधारित केलेलं केळं आहे.

04
बनाना 21 नावाचा हा प्रकल्प 2005 मध्ये सुरू झाला होता. 18 वर्षांच्या मेहनतीनंतर शास्त्रज्ञांना यश मिळालं आहे. या केळ्यात क्षमतेपेक्षा जास्त जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे.  कुपोषणाशी संबंधित सर्व आवश्यक पोषक घटक यात आहेत.

05
जगातील अनेक देशांमध्ये जिथे कुपोषणामुळे मृत्यू होतात, तिथे हा रामबाण उपाय ठरेल आणि लाखो लोकांचे जीव वाचवता येतील, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

06
नॅशनल जिओग्राफिकच्या मते, सुपरबनाना लागवडीसाठी तयार आहे, पण शास्त्रज्ञ  सरकारी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. युगांडामध्ये जनुकीय सुधारित खाद्यपदार्थांच्या वापरास तीव्र विरोध आहे, ज्यामुळे सरकार त्यास मान्यता देण्यास टाळाटाळ करत आहे. (सर्व फोटो प्रतीकात्मक)

  • FIRST PUBLISHED :
  • केळं आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. यात कार्बोहायड्रेट, जीवनसत्त्वे ए, सी आणि बी-6, लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, सोडियम, पोटॅशियम यांसारखे पोषक घटक शरीराला मजबूत करतात. त्यामुळे डॉक्टरही केळी खाण्याचा सल्ला देतात.

    MORE
    GALLERIES