नाशिकमध्ये 'माऊली फॅमिली पान हाऊस' हे पानाचं दुकान प्रसिद्ध आहे. या दुकानात एक-दोन नव्हे तर तब्बल 600 पेक्षा अधिक प्रकारचे पान बनतात.
600 पेक्षा अधिक प्रकारचे पानांचे फ्लेवर गणेशकडे आहेत. अगदी 30 रुपयांपासून तर दीड लाख रुपयांपर्यंत पान त्याच्याकडे मिळते.
चंदन मसाला पान, नवाबी पान, चीज चॉकलेट पान, खसखस स्पेशल पान, राजधानी एक्सप्रेस पान, रजनीकांत पान, महफिल पान, नाईट कविन पान, मुमताज स्पेशल पान हे प्रकार इथं मिळतात.
माऊली फॅमिली पान हाऊसमध्ये तब्बल दीड लाख रुपयांचे पेशवाई गोल्ड पान मिळते. या पानाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे.