इडली, मसाला डोसा, वडा-सांबर हे दक्षिण भारतीय पदार्थ आता अगदी आपले वाटावे इतके महाराष्ट्रात रुळले आहेत. पुण्यातल्या तर प्रत्येक भागात हे पदार्थ मिळतात.
दाक्षिणात्य पदार्थांचे पुणे शहरात अनेक हॉटेल्स आहेत. या हॉटेल्समध्ये इडली, मसाला डोसा, वडा-सांबर खाण्यासाठी गर्दी होत असते.
पुण्यातील सा डोसा कॅफे मध्ये चक्क पाच फुटी लांबीचा डोसा मिळत असून हा डोसा खाण्यासाठीही ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. सा डोसा कॅफेची सुरुवात शुभम संगनवार यांनी 2019 मध्ये पुण्यात केली. कोरोनाच्या दोन महिन्या आधी त्यांनी सा डोसा कॅफे सुरू केला होता.
या डोसाचा आकार बघूनच लोकांना हा डोसा आवडला असता मात्र फक्त आकारावर महत्व न देता त्यांनी डोसाच्या चवीवर देखील काम केले. त्याच्यामुळे आज पुण्यातील सगळ्यात मोठा चविष्ट असा मसाला डोसा म्हणून लोक वाहवा करतात.
हा डोसा बनवण्यासाठी आम्ही त्याचा विशिष्ट तवा वापरतो. या डोसामध्ये आम्ही स्पेशल पोडी मसाला आणि ग्राहकांना हवे तसे बटर, तेल, तूप वापरतो. आमची स्पेशल ओली खोबऱ्याची चटणी सांबर हे देखील आम्ही स्पेशल बनवतो, असं सा डोसा कॅफे मालक शुभम संगनवार यांनी सांगितलं.
399 रुपयांना असलेला हा डोसा चार जण आरामात खाऊ शकतात. हा एखाद्या फ्रेंड्स ग्रुपसाठी फॅमिली साठी बेस्ट पर्याय असतो.
आमचा डोसा हा फरमेंटिंग केलेला नसतो. त्यामुळे या डोसामुळे लोकांना जे पित्त होतं किंवा त्रास होतो तो होत नाही. त्यामुळे हा डोसा लोक रात्रीच्या जेवणाच्या वेळेसाठी देखील खातात, असंही शुभम सांगतात.
गेल्या चार वर्षापासून आमच्या कॅफेची खासियत म्हणून हा डोसा सर्वत्र फेमस आहे. तसेच सैनिकांसाठी आमच्या येथील सर्व डोसे आणि पदार्थ फ्री आहेत. आमच्या पुण्यामध्ये विविध ठिकाणी एकूण पाच ब्रांच आहेत, असंही शुभम संगनवार यांनी सांगितलं.
प्रभात रोड, लेन नंबर 8, कर्वे रोड, गरवारे कॉलेज जवळ, कचरे कॉलनी, एरंडवणे, या ठिकाणी पाच फुटाचा डोसा मिळतो.