आपण सुंदर आणि तरुण दिसावं असं प्रत्येक महिलेला वाटतं. त्यासाठी त्या काय काय नाही करत. अनेकदा तर महिला तज्ज्ञांकडे जाऊन ब्युटी ट्रिटमेंट घेण्याऐवजी घरच्या घरीच उपाय करतात.
2/ 8
सध्या असाच ऑनलाईन व्हिडीओ पाहून ब्युटी ट्रिटमेंट घेणं ऑस्ट्रेलियातील एका सेलिब्रिटीला चांगलंच महागात पडलं आहे. त्यानंतर तिची अवस्था इतकी खराब झाली की तिला रुग्णालयातच दाखल करण्याची वेळ आली.
3/ 8
21
वर्षांची टिली विटफेल्ड असं या महिलेचं नाव आहे. टिलीने ऑस्ट्रेलियन बिग ब्रदरमध्ये काम केलं आहे. या शोमध्ये येण्याच्या दोन आठवड्यांआधी तिने एक व्हिडीओ पाहिला होता आणि त्याचे गंभीर परिणाम तिला जाणवले.
4/ 8
टिकटॉकवर एक ब्युटी व्हिडीेओ पाहून तिने स्वतःवर त्याचा प्रयोग केला आणि काही वेळातच टिलीचा चेहरा जळला. इतकंच नव्हे तर तिच्या डोळ्यांची दृष्टीही गेली. ती आंधळी झाली.
5/ 8
लोकांना जागरूक करण्यासाठी तिने आपला हा अनुभव सोशल मीडियावर मांडला आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने आपले काही फोटोही शेअर केले आहेत.
6/ 8
मी जी चूक केली ती तुम्ही करू नका. कोणतीही ब्युटी प्रोसिझर करायची असेल तर त्याआधी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. स्वतःच काहीही चेहऱ्यावर लावू नका, असं आवाहन तिने केलं आहे.
7/ 8
टिलीचे हे फोटो पाहूनच तुम्हाला धक्का बसला असेल. तिच्या चेहऱ्याची अवस्था भयंकर झाली आहे.
8/ 8
त्यामुळे तुम्हीसुद्धा सुंदर दिसण्याच्या नादात असे प्रयोग करू नका.