साडी भारताचं पारंपारिक वस्त्र आहे. लग्नात बहुतेक भारतीय स्त्रिया साडीच परिधान करतात. आता पारंपारिक पद्धतीने साडी नेसण्याची पद्धत बदलायला लागली आहे.
तसंतर भारतातच प्रत्येक प्रदेशानुसार साडी नेसण्याची पद्धत बदलते. पण, ड्रेस डिझायनर्स आणि फॅशनिस्टा अनेक कार्यक्रमात साडी आवडीने घालतात तेही वेगळ्या पद्धतीने.
रेखा, विद्याबालन, माधूरी दीक्षित यांच्या प्रमाणे अलिकेड आलिया, श्रद्धा कपूरही कितीतरी कार्यक्रमात साडीत दिसतात. बॉलिवूडच्या याच स्टार्सनी साडीला फॅशन बनवलं आहे.
साडी हे असं आऊटफिट आहे, ज्याच्याबरोबर अनेक एक्सपिरीमेंट करता येतात. साडीबरोबर बेल्ट,कॅप,कोट क्लब केला तर, साडीचा पूर्ण लूकच बदलून जातो.
पारंपारिक साडी घालून त्यावर दुपट्टा घेण्याची फॅशन आता सुरू झाली आहे. लग्नात नवरीशिवाय तुम्हीसुद्धा अशा प्रकारे साडी ड्रेप करू शकता. यामुळे साधी दिसणारी साडी डिझायनर लूक देते.
हल्ली मफलर स्टाईलमध्ये साडीवर दुपट्टाही घेणंही फॅशनमध्ये आहे. रेखाने या सफेद रंगाच्या साडीवर त्याच रंगाचा दुपट्टा गळ्यात घातला आहे.