फक्त 45 मिनिटांच्या व्यायामाने खुलवा त्वचेचं सौंदर्य
व्यायामाने (excercise) फक्त शरीरच नाही तर त्वचाही (skin) हेल्दी होते
|
1/ 14
आपल्या त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी केवळ ब्युटी प्रॉडक्ट्स न वापरता निरोगी जीवनशैली आणि पोषक आहाराचे सेवन केल्यास नक्कीच नैसर्गिकरित्या सौंदर्य खुलवता येतं.
2/ 14
कोरोना लॉकडाऊनमुळे घरबसल्या आपल्या त्वचेवर लावण्यात येणा-या रासायनिक उत्पादनांचा वापर कमी झाला आणि आपली त्वचा मोकळा श्वास घेऊ लागली.
3/ 14
कोरोना लॉकडाऊनमुळे बाह्य उत्पादनांचा वापर न करता नैसर्गिकरित्यादेखील त्वचा स्वच्छ आणि सुंदर राहू शकते याचा प्रत्यय आला आहे.
4/ 14
त्वचा नैसर्गिकरित्या कशी सुंदर ठेवता येईल यासाठी द एस्थेटिक क्लिनिक्सच्या त्वचारोग सल्लागार आणि कॉस्मेटिक त्वचारोग तज्ज्ञ डॉ. रिंकी कपूर यांनी काही टिप्स दिल्या आहेत.
5/ 14
आठवड्यातून तीन वेळा 45 मिनिटं व्यायाम केल्यास आपली त्वचा निरोगी आणि चमकदार राहील. व्यायामाचा एक नित्यक्रम आखून त्यानुसार न चूकता व्यायाम करा. आपल्याला लवकरच फरक दिसेल.
6/ 14
जर आपण पुरेशी झोप घेत नसाल तर त्याचे दुष्परिणाम त्वचेवर जाणवू लागतात. डोळ्याखाली काळी वर्तुळे, सुरकुत्या आणि थकवा दिसून येतो. त्यामुळे दररोज रात्री किमान 7 तास झोप घ्या
7/ 14
हायड्रेट राहा. ठराविक अंतराने पाणी प्या. आहारात काकडी, टोमॅटो, कोबी, द्राक्षं आणि टरबूज यांचा समावेश करा. त्वचेची आर्द्रता योग्य राखल्यास त्वचा निरोगी आणि चमकदार दिसते.
8/ 14
तणावापासून दूर राहा. ताणामुळे कॉर्टिसॉल हार्मोन्सची निर्मिती जास्त होते ज्यामुळे त्वचा कोरडी पडते, सुरकुत्या येतात. तणावमुक्त राहण्यासाठी स्वतःसाठी वेळ द्या आणि पुरेसा आराम करा.
9/ 14
मीठ, साखर, मध आणि नारळ तेल यांचं मिश्रण तयार करा. हे मिश्रण आठवड्यातून दोनदा त्वचेवर लावून मृत त्वचा काढून टाका.
10/ 14
द्राक्षं अर्ध कापून घ्या आणि त्वचेवर चोळा. जेणेकरून त्वचा स्वच्छ होईल.
11/ 14
चेहऱ्यावरील छिद्रं बंद करण्यासाठी फेस मास्कचा वापर करा. पपईचा मास्क वापरा.
12/ 14
सूर्यापासून संरक्षण करणारे मॉईश्चरायझर वापरा
13/ 14
केस कोरडे होत असतील तर रिकाम्या स्प्रे बॉटलमध्ये 1 चमचा सी सॉल्ट 200 मिली पाण्यात मिसळा आणि त्यात लेव्हेंडर तेलाचे 8 थेंब घाला. ओलसर केसांवर स्प्रे करा. केसांमधील कोरडेपणा दूर होईल.