1-खूप गरम चहा पिणं खूप गरम चहा प्यायला आवडत असेल तर तुम्हाला तुमची ही सवय बदलण्याची गरज आहे. फार गरम चहा प्यायल्याने तोंडात फोड-अल्सरचा त्रास होऊ शकतो. शिवाय गरम चहा घशातून गिळताना अन्न नलिकेचे नुकसान होते. त्यामुळे असं करणं टाळा.
2-एका दमात किंवा दोन घोटात चहा संपवणे - गरम चहा पिताना तो घोट-घोटच पिणे फायद्याचे आहे. गडबडीत एक किंवा दोन घोटात चहाचा कप खाली करणं तुमच्या फूड पाईपला खराब करण्याचे काम करते. गरम चहा अशा पद्धतीनं सतत घेत राहिल्यास अन्न नलिका खराब होऊ शकते.
3-चहामध्ये मीठ घालणे काहीजण चहात मीठ घालून पितात. वास्तविक, मीठ तुमच्या घशाखाली जाऊन तुमच्या अन्न नलिका घासण्याचे काम करते. चहामधील मीठ विरघळते आणि ते क्रिस्टल्सचे रूप धारण करते, त्यामुळे अन्न नलिकेला त्रास होतो.
4-कडक मसाला चहा - तुम्हाला कडक मसाला चहा प्यायला आवडत असला तरी तुम्हाला तुमची ही सवय बदलण्याची गरज आहे. वास्तविक, कडक मसाल्यांमुळे अन्ननलिकेला सूज येणे, अल्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे अन्न पचणे कठीण होते. त्यामुळे चहामध्ये कडक मसाले सतत वापरू नका.
5-तमालपत्राचा वापर - तुम्ही चहामध्ये तमालपत्र वापरत असला तरीही ते तुमच्या फूड पाईपला खराब करण्याचे काम करते. तमालपत्रामध्ये असलेले गुणधर्म थेट तुमच्या अन्ननलिकेमध्ये जळजळ निर्माण करण्याचे काम करतात. तमालपत्र मर्यादेत प्रमाणात कधीतरी वापरू शकता.