तळल्यानंतर उरलेल्या तेलाचा वापर तुम्ही दरवाजे खिडक्यांना ग्रीसिंग करण्यासाठी देखील करू शकता. हे तेल एका बाटलीत भरा आणि त्या बाटलीच्या झाकणाला होल पाडून तेल दरवाजे खिडक्यांच्या हुक्स आणि जॉइंट्सवर लावू शकता.
उरलेल्या तेलाचा वापर तुम्ही बागकामासाठी देखील करू शकता. ज्या वनस्पतीमध्ये जास्त कीटक असतील त्या जवळ हे तेल एका भांड्यात ठेवा. अशा स्थितीत ते किडे तेलाच्या वाटीजवळ येऊन झाडाला इजा पोहोचवणार नाहीत.
कढईत उरलेल्या तेलाचे काही थेंब जर तुम्ही फरशी पुसण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बकेटमध्ये टाकले, तर त्यातील दुर्गंध दूर होऊ शकतो.