लिंबाचा रस – लिंबाचा रस हा अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी उत्तम उपाय आहे. काखेतील काळेपणा दूर करण्यासाठी ३ चमचे लिंबाचा रस घेऊन त्यात साखर मिक्स करून ते काखेत लावा. हे मिश्रण काखेत लावून १० मिनिटं मसाज करा. काखेतील काळपटपणा नक्की दूर होईल.
ॲपल सायडर व्हिनेगर - अन्नात आंबटपणा वाढवणाऱ्या ॲपल सायडर व्हिनेगरमध्ये अमीनो आणि लैक्टिक ॲसिड असते. यात तुरट गुणधर्म आहेत, जे तुमच्या त्वचेतील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करतात आणि त्वचा स्वच्छ ठेवतात. तेव्हा ॲपल सायडर व्हिनेगरचे काही थेंब अंडरआर्म्सवर लावा आणि वाळल्यानंतर त्वचा स्वच्छ धुवून टाका.
एलोवेरा जेल - एलोवेरा म्हणजेच कोरफड आपली त्वचा स्वच्छ करण्यास मदत करते. कोरफडीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असल्याने ते त्वचेतील जळजळ आणि डेड सेल्स काढून टाकतात. तेव्हा एलोवेरा जेल एक महिना सतत काळ्या अंडरआर्म्सवर लावल्याने काळेपणा दूर होण्यास मदत होते.
बटाट्याचा रस – बटाट्याचा रस हा अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. एका बटाट्याचा किस करून त्याचा रस काढून घ्या. आणि या रसाने काखेत मसाज करा. हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा केल्यास अंडरआर्म्समध्ये फरक जाणवतो.
तांदळाचे पीठ आणि मध : अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी त्याजागी तुम्ही तांदळाच्या पीठाने स्क्रब करू शकता. तांदळाच्या पिठात मध मिक्स करून स्क्रब करा जेणेकरून डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा पुन्हा गोरी होण्यास मदत होईल. मधामध्ये नैसर्गिक अँटीसेप्टिक आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात. तांदळाचे पीठ आणि मध यांचे मिश्रण लावून स्क्रब केल्यानंतर थोड्यावेळाने हात स्वच्छ धुवा. तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही ओट्सचे पीठ देखील वापरू शकतात.
बेकिंग सोडा आणि दही : अंडरआर्म्सचा काळेपणा घालवण्यासाठी बेकिंग सोडा खूप चांगला मानला जातो. बेकिंग सोडा एक्सफोलिएटर म्हणून काम करतो. तर दह्याचा ब्लीचिंग प्रभाव असतो. बेकिंग सोड्यामध्ये थोडे दही मिसळून पेस्ट तयार करा, आणि ती अंडरआर्म्सवर लावून स्क्रब करा. थोड्या वेळाने हात स्वच्छ धुवा.