भारतात आता प्रेग्नंट महिलांनाही कोरोना लस दिली जाणार आहे. गर्भवती महिलांच्या कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
2/ 6
नॅशनल टेक्निकल ॲडव्हायझरी ग्रुपची (NTAGI) शिफारस केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्य केली आहे.
3/ 6
प्रेग्नंट महिलांना कोरोना लस घ्यायची असल्यास त्यांना कोविन (CoWIN) पोर्टलवर नोंदणी करावी. किंवा त्यांना जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करून लस घेण्याचा पर्यायही त्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
4/ 6
नॅशनल टेक्निकल ॲडव्हायझरी ग्रुपने (NTAGI) दिलेल्या माहितीनुसार प्रेग्नंट महिला आणि तिच्या बाळासाठीही कोरोना लस सुरक्षित आहे.
5/ 6
आईच्या पोटात वाढणाऱ्या बाळावर कोरोना लशीचा काहीही गंभीर दुष्परिणाम होणार नाही.
6/ 6
उलट कोरोना लशीमुळे आईच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाल्यास ती त्याच्या गर्भालाही मिळू शकते.