प्रभूदेवाने 2020 मध्ये हिमानीशी दुसरं लग्न केलं. लग्नाच्या तीन वर्षांनी हिमानी हिने पहिल्या मुलीला जन्म दिला. प्रभूदेवाला पहिल्या पत्नीपासून 3 अपत्य आहेत, ते तिघेही मुलगे आहेत. अभिनेता चौथ्यांदा बाप झाला असला तरी पहिल्यांदा एका मुलीचा बाप झाला. पहिल्यांदा त्याच्या घरी मुलीचा जन्म झाला आहे. त्यामुळे अभिनेता प्रचंड खूश आहे.
प्रभूदेवा वयाच्या पन्नाशीत बाबा झाल्यानंतर पुरुष कोणत्या वयापर्यंत वडील होऊ शकतात, अशी चर्चा होताना दिसतेय. या संदर्भात 'नवभारत टाइम्स'ने वृत्त दिलंय.
वयाच्या पन्नाशीत बाबा होणं, या गोष्टीत आश्चर्य व्यक्त करण्यासारखं काही नाही. कारण पुरुषांची फॅटर्लिटी आयुष्यभर तशीच राहते.
वयाबरोबर येणाऱ्या अडचणी - पुरुष कोणत्याही वयात बाबा बनू शकत असले तरी वाढत्या वयाबरोबर अनके अडचणी व गुंतागुंती वाढतात.
शक्ती कमी होणे - वाढत्या वयामुळे पुरुषांच्या स्पर्मची गुणवत्ता व शक्ती कमी होते, त्यामुळे महिलांना गर्भधारणेत अडचणी येतात.
पुरुषांसाठी बाबा होण्याचं योग्य वय कोणतं - 'स्टीज'च्या रिपोर्टनुसार, 22 ते 35 हे पुरुषांसाठी बाबा होण्याचं सर्वोत्तम वय आहे.
महिला व वयाचं बंधन - याबाबतीत महिलांबद्दल बोलायचं झाल्यास, त्यांना एका ठराविक वयापर्यंतच आई होता येतं. जन्मापासूनच प्रत्येक महिलेत एका निश्चित संख्येत एग्ज बनतात, जे वाढत्या वयाबरोबर नष्ट होत जातात.
महिलांचा फॅर्टिलिटी पीरियड - बहुतेक महिलांचा मेनोपॉज 40 ते 45 या वयात सुरू होतो. त्यानंतर महिलांची फर्टिलिटी झपाट्याने कमी होऊ लागते.
मग महिला आई होऊ शकत नाहीत का? - मेनोपॉजमध्येही महिला आई होऊ शकतात, पण ते खूप रिस्की असतं. यादरम्यान गर्भपात होणं, बाळाला कॉम्प्लिकेशन्स येण्याच्या शक्यता खूप वाढतात.
महिलांसाठी आई होण्याचं योग्य वय कोणतं? - 20 ते 30 हे वय महिलांना आई होण्यासाठीचं योग्य वय आहे. यानंतर महिलांची एग्ज कमी होऊ लागतात. त्यामुळे आई होण्यास अनेक अडचणी व गुंतागुंतींचा सामना करावा लागतो.