advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / तुम्हालाही रात्री झोपल्यानंतर भरपूर घाम येतो का? असू शकतं गंभीर आजाराचं लक्षण

तुम्हालाही रात्री झोपल्यानंतर भरपूर घाम येतो का? असू शकतं गंभीर आजाराचं लक्षण

बहुतेक लोकांना रात्री झोपेत भरपूर घाम (sweating) येण्याची समस्या असते.

01
तुम्ही पांघरूण ओढून झोपल्यानंतर घाम येणं साहजिक आहे. मात्र पांघरूण घेतलेलं नाही तरीदेखील झोपल्यानंतर तुम्हाला इतका घाम येतो की तुमची झोपमोड होते, घामाने चादर अक्षरश: ओली होते. तर मात्र त्यामागे काही इतर कारणं असू शकतात. वेब एमडीने याबाबत माहिती दिली आहे.

02
हायपरथायरॉइड - घाम येणं हे थायरॉइडच्या समस्येचं लक्षण असू शकतं. हायपरथायरॉइड असल्यास रात्री भरपूर घाम येतो. थायरॉइड ग्रंथी चयापचय प्रक्रिया नियंत्रित करत असतात. जेव्हा या हार्मोन्सची निर्मिती जास्त होते, तेव्हा त्याचा परिणाम शरीरावर होतं, शरीराचं तापमान वाढतं आणि घाम येऊ लागतो. याशिवाय भूक, तहान लागणं, थकवा, वजन कमी होणं अशा समस्याही दिसून येतात.

03
ब्लड शुगर कमी होणं - तुम्हाला मधुमेह असेल तर रात्री घाम येण्याची समस्या उद्भवते. दिवसभर रक्तातील साखरेची पातळी योग्य असते मात्र झोपल्यानंतर ती कमी होऊ शकते. तुम्ही दिवसभर शारीरिक कार्य केली असतील, जेवण उशिरा केलं असेल त्याचाही परिणाम होतो. डायबेटिजसाठी घेतल्या जाणाऱ्यां औषधांचाही असा परिणाम होतो.

04
स्लिप अॅप्निया - ही समस्या म्हणजे रात्री झोपेत श्वास घ्यायला त्रास होणं. परिणामी तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सजिन मिळत नाही. शरीर ऑक्सिजन मिळवण्यासाठी प्रयत्न करत असते, त्यामुळे घाम येतो.

05
अॅसिड रिफ्लेक्स - यामध्ये तुम्हाला फक्त छातीत जळजळ वेदना होत नाही तर रात्री घामही येतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी शक्यतो कमी जेवा. तळलेले, चरबीयुक्त पदार्थ खाऊ नका.

06
टीबी - ज्या लोकांना टीबी असतो, त्या निम्म्या लोकांना रात्री घाम येण्याची समस्या असते. थकवा, अशक्तपणा, भूक न लागणे अशी लक्षणंही दिसून येतात.

  • FIRST PUBLISHED :
  • तुम्ही पांघरूण ओढून झोपल्यानंतर घाम येणं साहजिक आहे. मात्र पांघरूण घेतलेलं नाही तरीदेखील झोपल्यानंतर तुम्हाला इतका घाम येतो की तुमची झोपमोड होते, घामाने चादर अक्षरश: ओली होते. तर मात्र त्यामागे काही इतर कारणं असू शकतात. वेब एमडीने याबाबत माहिती दिली आहे.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement