लिंबूवर्गीय फळे वास्तविक लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम त्यामुळे होते. यासाठी द्राक्षे, लिंबू, संत्री, बेरी, पेरू इत्यादी फळे मुलांना नाश्त्यात द्यायला हवीत.
दही - दही हे एक प्रोबायोटिक अन्न आहे, जे आतड्यात असलेले चांगले बॅक्टेरिया मजबूत करण्यास मदत करते. हे पचनसंस्थेसाठीही चांगले असते. लहान मुलांना जेवणासोबत दही दिल्यास त्यांची प्रतिकारशक्ती चांगली राहते.
हिरव्या पालेभाज्या - हिरव्या पालेभाज्यांमध्ये फॉलिक अॅसिड आणि लोह मुबलक प्रमाणात असते आणि त्यात व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-के आढळतात. मुलांच्या आहारात मेथी, पालक इत्यादी भाज्यांचा समावेश जरूर करावा.
ड्रायफ्रूट्स- ड्रायफ्रूट्समध्ये झिंक, लोह, व्हिटॅमिन-ई, ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स इत्यादी भरपूर प्रमाणात असतात. कोणत्याही प्रकारचे संक्रमण वाढण्यापासून रोखण्यासाठी त्याचा फायदा होतो. अशा स्थितीत मुलांना सकाळी लवकर सुका मेवा खायला द्यावा.
नारळ पाणी - नारळाच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चांगले असतात. यासाठी तुम्ही मुलांना नारळ पाणी देऊ शकता.
अंडी - मुलाला रोज एक अंडे खायला दिले तर त्याच्या शरीरातील प्रथिनांचे प्रमाण चांगले राहील आणि अनेक आजार दूर राहतील. मुलाला उकडलेले अंडे अधिक फायदेशीर होईल.
मासे - जर तुम्ही मुलाला मासे दिले तर ते त्यांच्या शरीरातील ओमेगा 3 फॅटी ऍसिडची गरज सहज पूर्ण होईल आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल.
मांस - जेवणात मांस किंवा कोंबडी दिल्यास शरीरात झिंक, लोह, प्रथिने इत्यादींचा पुरवठा होतो आणि मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)