रात्री झोपण्यापूर्वी अनेक जण नाइट क्रिम लावतात, मात्र त्याऐवजी तुम्ही खोबरेल तेल लावलं तरी तुम्हाला बरेच फायदे होतील.
खोबरेल तेलात लॉरिक असिड असतं, ज्यामुळे कोलेजनची निर्मिती वाढते. कोलेजन त्वचेची लवचिकता आणि ग्लो राखण्यास मदत करतं.
खोबरेल तेल चेहऱ्याला लावून हळुवार मसाज करा आणि सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुवा. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर शक्यतो तेलाचा वापर त्वचेसाठी करू नका.
ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी देत नाही. अंमलबजावणीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.