खरं की खोटं? कोरोना लॉकेट व्हायरसला आपल्यापासून ठेवतो दूर
मास्क, सॅनिटायझर नाही तर सध्या कोरोना लॉकेटची (corona lockets) जोरदार चर्चा सुरू आहे.
|
1/ 5
कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी आपण मास्क लावतो, सॅनिटायझर वापरतो मात्र लॉकेट घालूनही कोरोनाव्हायरसपासून बचाव करता येऊ शकतं, असं सांगितलं तर?
2/ 5
उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये सध्या अशाच कोरोना लॉकेटची खूप चर्चा सुरू आहे. हे लॉकेट घातल्यानंतर कोरोनाव्हायरस तुमच्या जवळही येणार नाही, असा दावा केला जातो आहे.
3/ 5
मेरठचे सीएमओ डॉक्टर राजकुमार यांनी सांगितलं, कोरोनाव्हायरसपासून बचाव करणारं लॉकेट म्हणून कुणी दावा करत असेल तर हे सर्व खोटं आहे. फसवण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
4/ 5
कोणत्याही लॉकेटने कोरोनाव्हायरस दूर जात नाही. जेव्हा आपण मास्क लावून, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करू, सर्दी-खोकला किंवा ताप आल्यावर लगेच चाचणी करू, तेव्हाच कोरोना हरेल, असं डॉ. राजकुमार यांनी सांगितलं.
5/ 5
याआधीदेखील मेरठमध्ये कोरोनाला दूर भागवणारा दावा करत चहा विकला जात होता. त्याची चौकशी करण्यात आली. दरम्यान आता हे लॉकेट चर्चेचा विषय आहे, त्यामुळे त्यावर आता काय कारवाई होईल हे पाहावं लागेल.