शॉपिंग हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तुम्ही मुंबईत आलात आणि शॉपिंग केली असे होऊ शकत नाही. मुंबईत असे काही मार्केट आहेत जिथे तुम्ही अगदी 200 रुपयांपासून वस्तूंची खरेदी करू शकतात. आज आम्ही तुम्हाला याच मुंबईतील 9 मार्केट बद्दल सांगणार आहोत.
वांद्रे येथील लिंकिंग रोड हे खरेदीसाठी प्रसिद्ध मार्केट आहे. हे मार्केट आरडी नॅशनल कॉलेज परिसरामध्ये आहे. येथे वेस्टर्न फूट वेअर, क्लोथ आणि अॅक्सेसरिज उपलब्ध आहेत. या वस्तूंची खरेदी तुम्ही कमी किमतीत करू शकतात.
कुलाबा कॉझवे हे फोर्ट परिसराजवळील मुंबईतील अत्यंत प्रसिद्ध मार्केट आहे. येथे हातमागावर तयार करण्यात आलेल्या गोष्टी, पुस्तकं, कपडे, शूज, ज्वेलरी आणि बरच काही अशा युनिक गोष्टी अगदी परवडणाऱ्या किंमतीत मिळतात.
अंधेरी पश्चिममध्ये लोखंडवाला मार्केट आहे. या ठिकाणी तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे कपडे लगेच शिवून मिळतील. या ठिकाणी मान्सून चॅट कॉर्नर थियोब्रोमा आणि ईडन बेकरी प्रसिद्ध आहे.
ग्रँट रोडच्या मार्केटमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक, गॅझेट्स, मोबाईल फोन, लॅपटॉप मिळतील. या मार्केटमध्ये रॉयल ओपेरा हाउस आहे.
फॅशन स्ट्रिट हे मार्केट आझाद मैदानाजवळ आहे. या ठिकाणी ट्रेंडी आणि सर्वात लेटेस्ट फॅशन उपलब्ध होते. त्यामुळे मुंबईकर या ठिकाणी हमखास शॉपिंग करतात. फॅशन स्ट्रिटवर 350 हून अधिक स्टॉल्स असून स्वस्त दरात हवी तेवढी शॉपिंग करता येते.
क्रॉफर्ड मार्केट हे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या उत्तरेला जे.जे. उड्डाणपूला जवळ हे मार्केट आहे. या ठिकाणी होलसेलमध्ये फळ, भाज्या आणि मसाले मिळतात. तसेच तुम्हाला जर पाळीव प्राण्यांची किंवा पक्ष्यांची आवड असेल तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकतात.
वांद्रे येथील हिल रोड मार्केट प्रसिद्ध आहे हे मार्केट एल्को रेस्टॉरंट जवळ आहे. हार्डवेअर, लाकडी वस्तूंची खरेदी,कपडे खरेदी या ठिकाणी तुम्ही करू शकतात. लक रेस्टॉरंट आणि सेंट अँड्र्यूज चर्च या ठिकाणी आहे.
कपडे खरेदीसाठी दादरमधील हिंदमाता मार्केट हा उत्तम पर्याय आहे. या मार्केटमध्ये कपड्याची असंख्य दुकानं वसलेली आहेत. या मार्केटमध्ये ड्रेस आणि साड्यांची खरेदी तुम्ही करू शकतात.
हीरा पन्ना मार्केट हाजी अली दर्गा आणि महालक्ष्मी मंदिर जवळ आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू साठी प्रसिद्ध आहे.