डब्ल्यूएचओने भारताच्या मॅडन फार्मास्युटिकल्स कंपनीला खोकला आणि सर्दी सिरप संदर्भात इशारा दिला आहे. आफ्रिकन देश गाम्बियामध्ये 66 मुलांचा मृत्यू झाल्यानंतर हा इशारा देण्यात आला आहे. ही मुले कफ सिरप पीत होती. अशा स्थितीत औषधे घेताना काय काळजी घेतली पाहिजे? अनेकदा आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय थेट मेडीकलमधून औषधे घेऊन खातो. ते किती सुरक्षित आहे? चला जाणून घेऊ.
काही औषधे सकाळी रिकाम्या पोटी घ्यावी लागतात. ती फक्त सकाळी घेतली पाहिजे. जर तुम्ही एखादा दिवस विसरलात तर दिवसभरात जेव्हा आठवेल तेव्हा ते घ्या. यामुळे औषध 100 टक्के कार्य करू शकत नाही. मात्र, 70 ते 80 पर्यंत कार्य करते.
जर तुम्हाला थायरॉईडच्या औषधांसोबत गॅसची औषधे घ्यायची असतील, तर आधी थायरॉईडची औषधे घ्या, त्यानंतर 30 मिनिटांनंतरच गॅसची औषधे घ्या.
डोळे आणि कानात सोडण्यासाठी दिलेली द्रव औषधे उघडल्यानंतर जास्तीत जास्त 30 दिवसांपर्यंतच वापरा. त्यानंतर वापरणे असुरक्षित आहे.
जर कोणी न्यूरोची औषधे घेत असेल, मग ते एपिलेप्सी असो किंवा इतर काही. औषध योग्य वेळी घेतले पाहिजे. जास्तीत जास्त 20 ते 30 मिनिटांचा विलंब होऊ शकतो. ही औषधे वेळेवर न घेतल्यास शरीरात औषधाचा तुटवडा निर्माण होतो, पुन्हा झटके येण्याची शक्यता असते.
व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स सहसा दुधासोबत घेण्याचा सल्ला दिला जातो. कारण ही जीवनसत्त्वे चरबीमध्ये विरघळणारी असतात. त्यामुळे शरीर त्यांना सहजपणे शोषण्यास मदत करते. जे दूध पीत नाहीत ते पाण्यासोबत घेऊ शकतात.
बहुतेक औषधे लिव्हरमध्ये पोहोचल्यानंतरच सक्रिय होतात. त्यामुळे जर कोणाचे लिव्हर खराब असेल किंवा फॅटी लिव्हरची गंभीर समस्या असेल तर डॉक्टर त्यांना अनेक प्रकारची औषधे लिहून देत नाहीत.
जेव्हा प्रॉब्लेम क्रॉनिक असतो, म्हणजे औषध बराच काळ चालू असते, तेव्हा लोक बर्याच वेळा विसरतात. उदाहरणार्थ: शुगर, बीपी, किडनीच्या समस्या इ. अशा वेळी पिल केस किंवा मेडिसिन ऑर्गनायझर इत्यादी नावाने असे बॉक्स उपलब्ध असतात, ज्यामध्ये डोसनुसार आठवडाभर किंवा महिनाभर औषध ठेऊ शकता. या पेट्यांची किंमत 60 रुपयांपासून सुरू होते. या नावांनी शोधल्यास ऑनलाइन आणि ऑफलाइन केस मिळेल. (डिस्क्लेमर : ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारीत आहे. कोणत्याही प्रकारचा त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)