महिलांना अनेकदा थकवा, अशक्तपणा, मूड बदलणे, मासिक पाळीच्या आसपास ब्लोटिंग यासारख्या समस्या सुरू होतात. थकव्यामुळे महिलांच्या दैनंदिन दिनचर्येवरही परिणाम होऊ शकतो, थकवा आणि अशक्तपणा बराच काळ जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. संशोधनानुसार, थकवा आणि अशक्तपणा जाणवण्याचे एक कारण म्हणजे मासिक पाळीपूर्व डिसफोरिक डिसऑर्डर. हा त्रास मासिक पाळी येण्याच्या 7 किंवा 10 दिवस आधी सुरू होतो. त्याच्या मुख्य लक्षणांमध्ये खूप थकवा येणे किंवा अशक्त वाटणे, राग येणे, चिडचिड होणे ही लक्षणे दिसू शकतात.
भरपूर पाणी प्या - शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. निर्जलीकरणामुळे ऊर्जा कमी होते आणि शरीरात पेटके येतात. अशक्तपणा आणि थकवा दूर करण्यासाठी भरपूर पाणी पिणे हा एक चांगला पर्याय आहे. भरपूर पाणी पिण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. थंडीच्या दिवसात तहान कमी लागत असली तरी लक्षात पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे.