सुरक्षित शारीरिक संबंध आणि गर्भनिरोधक म्हणून कंडोम वापरला जातो. अगदी स्वस्तापासून ते महागापर्यंत जसं तुम्हाला हवा तसा कंडोम तुम्ही घेऊ शकता. पण एखादं कंडोम महाग म्हणजे किती महाग असू शकतं, याचा विचार कधी तुम्ही केला आहे का?
माहितीनुसार स्पेनच्या एका छोट्याशा गावात एक बॉक्स सापडला. या बॉक्समध्ये कंडोम होता. या कंडोमचा अभ्यास केल्यानंतर ते 200 वर्षे जुनं असल्याचं समजलं. त्यावेळी फक्त उच्च समाजातील लोकच कंडोमचा वापर करू शकत होते. (प्रतीकात्मक फोटो)
त्या कंडोमची लांबी 19 सेमी असल्याचं सांगितलं जातं आहे. तेव्हा सामान्यपणे कंडोमची लांबी 15 सेमी असायची. (प्रतीकात्मक फोटो)
तो कंडोम मेंढ्यांच्या आतड्यांपासून बनवलेला होता. जेव्हा 19 व्या शतकात रबरी कंडोम बनवले जाऊ लागले. तेव्हा मेंढ्यांच्या आतड्यांपासून बनवलेला कंडोम नाहीसे झाले. (प्रतीकात्मक फोटो)
अॅमस्टरडॅममधील एका व्यक्तीने हा ऐतिहासिक कंडोम आणला. या कंड़ोमचा ऑनलाइन लिलाव करण्यात आला, तेव्हा अंदाजित रकमेच्या दुप्पट किमतीने त्याचा लिलाव झाला. (प्रतीकात्मक फोटो)
हा जगातील सर्वात महागडा आणि दुर्मिळ कंडोम असल्याचं सांगितलं जातं आहे. असे कंडोम फक्त म्युझियममध्येच पाहायला मिळतात. जगातील या सर्वात महागड्या कंडोमची किंमत £460 म्हणजे जवळपास 44 हजार रुपये. (प्रतीकात्मक फोटो)