आज पोस्टाची उपयुक्तता केवळ पत्रांपुरती मर्यादित नाही, तर आज बँकिंग, विमा, गुंतवणूक यासारख्या अत्यावश्यक सेवाही पोस्टाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मिळत आहेत. युनिव्हर्सल पोस्टल युनियनचा सदस्य बनणारा भारत हा पहिला आशियाई देश होता. पण, कधीपासून पोस्ट ऑफिस सुरू झाले, हे तुम्हाला माहितीय का? जागतिक पोस्ट दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊ. पोस्टाविषयी खास गोष्टी.
1874 मध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियन (यूपीयू) ची स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ स्वीडनची राजधानी बर्न येथे जागतिक पोस्ट दिवस साजरा केला जातो. जागतिक टपाल दिनाचा उद्देश टपाल विभागाची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, त्यांना जागरूक करणे आणि पोस्ट ऑफिसमध्ये समन्वय निर्माण करणे हा आहे.
1969 मध्ये, टोकियो, जपान येथे युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या बैठकीत काँग्रेसने 9 ऑक्टोबर हा पोस्टल दिवस घोषित केला. तेव्हापासून, दरवर्षी जगभरातील सुमारे 150 देश जागतिक पोस्ट दिन साजरा करतात. अनेक देश या निमित्ताने नवीन सेवाही सुरू करतात.
भारतातील टपाल सेवेचा इतिहास खूप जुना आहे. कधी कबुतरांद्वारे, तर कधी मेघाला संदेशवाहक म्हणून संदेश पाठवण्याचा भारतीय पोस्टचा इतिहास साहसाने भरलेला आहे. दरवर्षी 9 ते 14 ऑक्टोबर दरम्यान पोस्टल सप्ताह साजरा केला जातो. आठवड्यातील प्रत्येक दिवशी वेगवेगळे दिवस साजरे केले जातात.
1766 मध्ये लॉर्ड क्लाइव्हने भारतात टपाल व्यवस्था पहिल्यांदा सुरू केली. वॉरन हेस्टिंग्जने 1774 मध्ये कलकत्ता येथे पहिले पोस्ट ऑफिस स्थापन केले. तर पत्रांवर पोस्ट करताना स्टॅम्प लावण्याची सुरुवात 1852 मध्ये झाली होती. भारतात पिन कोडची सुरुवात 15 ऑगस्ट 1972 रोजी सादर करण्यात आली. यानंतर प्रत्येक गावात आणि शहरात पोस्ट ऑफिस सुरू झाले.
सायकलवर 40 किमीच्या अंतरापर्यंत पत्र पोहचवणे ही भारतीय पोस्टमनची ओळख आहे, त्यामुळे आजही पत्र आल, पत्र आलं.. असं बोललं जातं.
बदलत्या काळातील तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आता क्वचितच कोणी पोस्टाद्वारे आपला संदेश पाठवत असेल. मात्र, अजूनही सरकारी, खाजगी कार्यालयासाठी पत्र पाठवणे सुरुच आहे.